शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

सिंधुदुर्गात रोजगारान्मुख अभ्यासक्रम सुरू करा

By admin | Updated: June 11, 2015 00:43 IST

ई. रविंद्रन : कुडाळात स्टार स्वयंरोजगारच्या कोनशिलेचा अनावरण समारंभ

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार धर्तीवर अभ्यासक्रम सुरू करा, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी स्टार स्वयंरोजगारच्या ईमारत कोनशिलेचा अनावरण समारंभप्रसंगी केले. या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ जिल्हाधिकारी रविंद्रन यांच्या हस्ते झाला. बँक आॅफ इंडिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान उपकेंद्र, कुडाळच्या इमारतीचा कोनशिला समारंभ कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. व्ही. बुचे, स्टार स्वयंरोजगारचे संचालक सुभाष नारायणकर, बँक आॅफ इंडियाचे के. बी. जाधव, ज्योती पडते, श्रीमूर्ती मानकामे, नायब तहसीलदार प्रवीण लोकरे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रविंद्रन म्हणाले, कुडाळमध्ये स्वयंरोजगारची उभी राहणारी ही इमारत या जिल्ह्यात भविष्यात नवीन तंत्रज्ञान आणेल. या ठिकाणाहून रोजगार निर्मितीचे अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. व्ही. व्ही. बुचे म्हणाले, स्टार स्वयंरोजगारच्या माध्यमातून गरजूंना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी विविध सोयी उपलब्ध करून हा प्रकल्प दीड कोेटीचा असून शासनाकडून एक कोटी मंजूरही झाले आहे व उर्वरित खर्च बँक आॅफ इंडिया करणार असून, येत्या सव्वा वर्षात हा प्रकल्प साकारणार असल्याचे ते म्हणाले. नारायणकर यांनी या संस्थेचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, गेल्या काही वर्षात ८७ विविध कार्यक्रम व उपक्रम असून भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेच अभ्यासक्रम येथे घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)