शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप’च्या महासंपर्क अभियानास प्रारंभ

By admin | Updated: June 9, 2015 00:13 IST

वेंगुर्लेत कार्यक्रम : काका कुडाळकर यांची उपस्थिती

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात भाजपचे सदस्य झालेल्या सात हजार सभासदांशी संपर्क साधून संवाद साधत केंद्र व राज्य सरकारचे निर्णय व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भाजपच्या महासंपर्क अभियानाचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्याच्या भाजपच्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पार पडला. वेंगुर्ले येथील भाजपच्या तालुका कार्यालयात वेंगुर्ले तालुका भाजप संपर्क अभियान बैठक साईप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तालुक्यात सदस्य झालेल्या सात हजार भाजप सदस्यांशी संपर्क साधून राज्य व केंद्रातील शासनाचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सूचना केल्या. बैठकीत त्याचे नियोजन केले. बैठकीस नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस दीपक माडकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, उपाध्यक्ष संदीप पाटील, दादा वाटवे, उपेंद्र वालावलकर, दाजी तांडेल, शहराध्यक्ष संजय तानावडे, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, अनंत नेरूरकर, रवींद्र शिरसाट, आप्पा ठाकूर, विनय गोगटे, दाजी धुरी, किरण तोरसकर, मंगेश परब, सोनू धुरी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस विजय नाईक व भाई गिरकर यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्ददल श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)आंबा कोंडसकर यांचा सत्कारवेंगुर्ले तालुका ‘आत्मा’ या कृषी समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आबा कोंडसकर यांचे तालुका पक्ष संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले. आत्माच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कोंडसकर यांनी सांगितले. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील डॉ. जाधव यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा वेंगुर्लेत आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.