सावंतवाडी : ‘सुंदरवाडी पर्यटन महोत्सव २०१५’च्या अनुषंगाने जिमखाना मैदान येथील कलादालनात चित्रकार एस. बी. पोलाजी यांच्या शिष्यांनी व जिल्हा छायाचित्र पुरस्कार विजेते अनिल भिसे यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी रात्री करण्यात आले. या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, बाळा गावडे, सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, अरुण भिसे, निखिल पाटील, समीर वंजारी, विकास सावंंत, आदी उपस्थित होते. सावंतवाडी येथील अनिल भिसे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे दर्शन या छायाचित्र प्रदर्शनातून सुंदरवाडी पर्यटन महोत्सवास आलेल्या तमाम रसिकांना व महोत्सवात आलेल्या पर्यटकांना घडवून आणले. यावेळी माजी खासदार नीलेश राणे म्हणाले, अशा प्रदर्शनांमुळे आपल्या जिल्ह्याची ओळख पर्यटकांना या माध्यमातून होत असते. त्यामुळे अशी प्रदर्शने जिल्हा मर्यादित न राहता राज्यस्तरीय पातळीवर होणे आवश्यक आहे. जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल, असे सांगून त्यांनी छायाचित्रकार अनिल भिसे यांचे कौतुक केले. यावेळी अनिल भिसे, राजेश आजगावकर, राहुल परब, सिद्धेश सर्वे, ऋषिकेश सावंत, नीतेश परिटे, तुकाराम परब, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)कलाकारांचे कौतुकएस. बी. पोलाजी यांच्या शिष्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. तसेच श्रीमंत शिवरामराजे भोसले, राजमाता सत्वशीलादेवी भोसले, काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, इंदिरा गांधी, तसेच श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी साकारली होती. या सर्व कलाकृती माजी खासदार नीलेश राणे यांनी पाहून या सर्व कलाकारांचे कौतुक केले.
कलाप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: February 10, 2015 00:26 IST