कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेत आता बदल होणार असून रेल्वे प्रशासनाने जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकाची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जाणार असून कोकण रेल्वेचा वेग त्यामुळे मंदावणार आहे.रेल्वे प्रशासनाने यावर्षी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्याच पावसाने दिलेल्या दणक्याने रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे ते आडवली स्थानकादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर पावसाच्या तीन महिन्यांसाठी नवे वेळापत्रक तयार करण्यात आले. १ जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पूर्वीच्याच वेळेत सुटणार आहेत. मात्र त्या नियोजित स्थळी एक ते दीड तास विलंबाने पोहोचतील तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या कोकणातील रेल्वे स्थानकात पूर्वीच्या वेळापत्रकापेक्षा एक ते दोन तास लवकर दाखल होणार आहेत.नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे- मडगावच्या दिशेने जाणारी राज्यराणी एक्सप्रेस दादर येथून २३.५५ वाजता सुटणार असून कणकवली येथे सकाळी १०.०२ वाजता तर सावंतवाडी येथे दुपारी १२.१० वाजता दाखल होईल. तर परतीच्या प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने सावंतवाडी येथून १७.३० वाजता रवाना होईल. कणकवलीत १८.२८ वाजता ही गाडी दाखल होणार आहे.कोकणकन्या एक्सप्रेस सीएसटीवरून २३.०५ वाजता सुटेल तर कणकवली सकाळी ८.४२ वाजता पोहोचेल. तर मुंबईच्या दिशेने जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस कणकवलीतून १९.१४ वाजता सुटेल. मांडवी एक्सप्रेस सीएसटी येथून सकाळी ७.१० वाजता सुटेल तर कणकवली येथे १६.४४ वाजता पोहोचेल. तर मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस कणकवलीतून सकाळी ११.०२ वाजता सुटेल. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर दिवा येथून ६.२० वाजता निघून कणकवली येथे १५.४५ तर सावंतवाडी येथे १७.१५ वाजता पोहोचेल.सावंतवाडी-दिवा पॅसेंजर सावंतवाडी येथून सकाळी ०८.३५ वा. निघेल तर कणकवली येथे ९.२५ वाजता पोहोचेल. मुंबई-मेंगलोर एक्सप्रेस सीएसटी येथून २२.०० वाजता सुटेल तर कणकवलीत ६.४२ वाजता पोहोचेल. तर मेंगलोर-मुंबई एक्सप्रेस कणकवली येथून ००.०४ वाजता सुटून सीएसटी येथे १०.३५ वाजता पोहोचेल.जनशताब्दी एक्सप्रेस दादर येथून पहाटे ०५.२५ वाजता सुटेल तर कणकवली येथे दुपारी १३.१४ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला निघणारी ही गाडी कणकवली येथून १४.२२ वाजता सुटून दादर येथे २३.०५ वाजता पोहोचेल. मंगला एक्सप्रेस पनवेल येथून सकाळी ९.३० वाजता सुटून कणकवली येथे सायंकाळी १७.४६ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासाला निघणारी ही गाडी कणकवली येथून पहाटे ३.३४ वाजता सुटून पनवेल येथे दुपारी १३.०० वाजता पोहोचेल. या गाड्यांबरोबरच एर्नाकुलम-ओखा, पुणे- एर्नाकुलम, हापा-मडगाव आदी गाड्यांच्या वेळेतही बदल झाला आहे. (वार्ताहर)
कोकण रेल्वेचा वेग
By admin | Updated: June 30, 2014 00:10 IST