शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच असगोलीला वगळणार?

By admin | Updated: March 3, 2016 00:03 IST

गुहागर नगरपंचायत : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच निर्णय

मंदार गोयथळे --असगोली  -ग्रामस्थांचा जोरदार विरोध असताना, केवळ नगरपंचायतीची स्थापना करण्यासाठी आवश्यक लोकसंख्येचा निकष पूर्ण व्हावा, याकरिता जबरदस्तीने नव्याने स्थापन झालेल्या गुहागर नगरपंचायतीमध्ये असगोली गावाचा समावेश करण्यात आला होता. त्याच असगोली गावाला येत्या डिसेंबरपर्यंत नगरपंचायतीमधून वगळून पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्याचा विचार नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपप्रणित राज्य शासनाने सुरू केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय जाहीर करण्याचा विचार असून, नगरपंचायतीमुळे त्रस्त झालेल्या असगोली ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाल्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार भास्कर जाधव हे नोव्हेंबर २००९ साली नगरविकास खात्याचे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गुहागरचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने असगोलीचा नगरपंचायतीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो शासनदरबारी राज्यमंत्री या नात्याने मंजूर करून घेतला. हे करीत असताना नगरपंचायतीसाठी आवश्यक असलेला लोकसंख्येचा किमान दहा हजाराचा निकष पूर्ण करण्यासाठी शहरालगतच्या असगोली, आरे किंवा वरवेली या गावांना समाविष्ट करुन घेण्याचा विचार पुढे आला. अखेर शेतकरी व मच्छीमार समाजाची मोठी लोकसख्ंया असलेल्या असगोली या गावाचा समावेश करण्याचा निर्णय शासनदरबारी निश्चित झाला. तो होत असताना असगोली ग्रामस्थांनी शासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध करुन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्येच आम्हाला नगरपंचायतीमध्ये समाविष्ट व्हायचे नसल्याचा एकमुखी ठराव केला. शासनाने ग्रामस्थांच्या या ठरावाला केराची टोपली दाखवून अखेर आपल्या अधिकारात असगोली गावाचा ६ आॅक्टोबर २0१२ रोजी नव्याने स्थापन झालेल्या गुहागर नगरपंचायतीमध्ये जबरदस्तीने समावेश केला. या समावेशानंतर असगोलीवासीयांनी शासनाच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर गुहागर नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही असगोलीवासीयांनी सहभाग घ्यायचा नाही, असा ठराव आपल्या गावच्या बैठकीत मंजूर करुन घेतला. तसेच न्यायालयात धाव घेऊन नगरपंचायत रद्द करण्याची मागणीही लावून धरली होती. परंतु यावेळी तसा कोणताही विरोधी निर्णय शासन किंवा न्यायालयाने न घेतल्याने असगोली गावाला निमूटपणे गुहागर नगरपंचायतीचा कारभार स्वीकारावा लागला. परंतु नंतरच्या काळात नगरपंचायतीसाठी आवश्यक लोकसंख्येचा निकष राज्य शासनाने रद्द करताना सर्व तालुक्याची ठिकाणे नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होतील, असा शासन निर्णय केला. याआधारे राज्यात बदललेल्या पक्षीय सत्तेचा फायदा घेत असगोली ग्रामस्थांनी आपली जुनी मागणी सत्ताधारी पक्षाचे नेते, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्यांचे मंत्री यांच्याकडे लावून धरली होती. त्या मागणीवर सकारात्मक विचार करुन राज्य शासनाने असगोली गावाचे स्वतंत्र अस्तित्व पुन्हा मिळवून देण्याचा दिलासादायक निर्णय घेताना त्या गावाची नव्याने ग्रामपंचायत तयार करण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित केला आहे. अशा प्रकारे घेतलेला निर्णय प्रत्यक्षात जाहीर झाल्यास नगरपंचायतीच्या कारभाराखाली दबल्या गेलेल्या असगोली गावातील शेतकरी, मच्छीमार तसेच सर्वसामान्य कुटुंबाना होणारा नाहक त्रास वाचणार असून, शासकीय कामकाजात मोठा दिसाला मिळणार आहे.