शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीज वितरणच्या समस्या सोडवा

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन : कुडाळ राष्ट्रवादीने घेतली अधिकाऱ्यांची भेट

जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन : कुडाळ राष्ट्रवादीने घेतली अधिकाऱ्यांची भेटकुडाळ : कुडाळ येथे नवीनच नियुक्त झालेले महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. बांबळे यांची कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यातील एमएसईबीच्या समस्या सोडवून जनतेला चांगली सेवा देण्याची विनंती केली. यावेळी महावितरणकडून जनतेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हा महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंतापदी एस. आर. बांबळे यांनी पदभार स्वीकारला. कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष दादा बेळणेकर, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, भास्कर परब, साबा पाटकर, संग्राम सावंत, लालू पटेल, नीलेश उमळकर, अशोक कांदे, धीरज पांचाळ, बाबल आळवे, अखिलेश होडावडेकर, सजीष गुरव आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीकडून जनतेला उद्भवणाऱ्या अनेक समस्या मांडल्या. जीर्ण झालेले विद्युत खांब, खराब झालेल्या विद्युत वाहिन्या, डीपी बॉक्स, वाहिन्यांवर धोकादायक वाढलेली झाडे याबाबत पावसाळ््यापूर्वी कार्यवाही न झाल्यास पावसाळ््यात धोकादायक स्थिती उद्भवते आणि त्याचा त्रास ग्राहकांना सोसावा लागतो. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी दुरुस्ती करून ग्राहकांना होणारा त्रास वाचविण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यात वीज बिल थकबाकीचे प्रमाण कमी आहे. ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरतात. मात्र, आपले महावितरणकडून जनतेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तसेच येथील महावितरणच्या समस्यांमुळे अनेक अपघातही घडले असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. अपघातग्रस्तांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. परंतु, त्यांच्या कुटुंबांकडे लक्ष द्यायला कंपनीला वेळ मिळाला नाही, अशी खंतही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आतातरी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दूर करून जनतेला अपेक्षित सेवा द्या, अशी विनंती करण्यात आली. (प्रतिनिधी)