शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गायकांचा ‘शॉर्टकट’ धोक्याचा

By admin | Updated: November 2, 2015 23:57 IST

भगवान लोकरे : पुरातन भजन कलेचा वारसा जिवंत ठेवणे आवश्यक

सिद्धेश आचरेकर -- मालवणकोकणात भजन या संगीत कलेला पारंपरिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेला भजन कलेचा वारसा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या काळात भजन क्षेत्रात संगीत सादर करण्याची रचनाच बदलून गेल्याचे चित्र आहे. मात्र आज तरुण बुवांचा ओढा भजन क्षेत्राकडे वाढला आहे. त्यामुळे युवा बुवा गायकांचा ‘शॉर्टकट’चा अवलंब धोक्याचा असल्याचे महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ (मुंबई)चे तथा भजनसम्राट भगवान लोकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘भजनात प्रासादिकता आणून सदसद्विवेक बुद्धीने आपली कला सादर करावी. आत्मसात केलेल्या कोणत्याही कलेला पळवाट काढणे चुकीचे आहे. आज भजनाचे स्वरूप बदलत असले तरी युवा गायकांनी आपल्या गायिकेला सिद्ध करून सर्वांपर्यंत भजनाच्या माध्यमातून पोहोचण्याचे भजन हे एकमेव व्यासपीठ आहे. मालवण बाजारपेठ येथील हनुमान मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित डबलबारी सामन्यासाठी आलेल्या बुवा लोकरे यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद साधला. दरम्यान बुवा भगवान लोकरे आणि बुवा प्रमोद हरयाण यांच्यात डबलबारीचा जंगी सामना रंगला. पारंपरिक आणि प्रश्नोत्तराच्या या बारीमुळे जुन्या-जाणत्या भजनी कलाकारांना पारंपरिक डबलवारीचा आनंद लुटता आला. संत साहित्याची हरिनामात जपणूक होणे आवश्यक आहे. बदलत्या काळाप्रमाणे बुवा व आयोजकांनी भजनाच्या व्याख्येत बदल केला आहे. भजनाचा मूळ गाभा, शास्त्रआधार, रागदारी यांचा मिलाप करून काही विनोद, किस्से यांची किनार देऊन भजन केले तर ते वावगे ठरत नाही. बुवांनी वर्षात वायफळ, अश्लील बतावणीला लगाम घालत हरिनामाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा विडा उचलला आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. हरिनामाची कास धरताना संस्कृतीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागता नये याची काळजी घेणे प्रत्येक बुवाचे प्रामाणिक कर्तव्य आहे, असे लोकरे यांनी सांगितले. टी-२० भजन प्रकाराला विरोध नाही४आमने-सामने अर्थात टी-२० भजन प्रकाराबद्दल विचारले असता, लोकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भजनातील डबलबारी प्रकारातील हा प्रकार अल्पवधीतच लोकप्रिय झाला. ४याला माझा कधीच विरोध नव्हता. विरोध होता तो कमी वेळात केल्या जाणाऱ्या वायफळ बतावणीला. डबलबारी आयोजक किंवा रसिकांना आवडते म्हणून ते चांगलेच आहे. त्याबद्दल दुमत नाहीच. ४पण भजनी बुवांनी भजनाची संज्ञा लक्षात घेऊन रसिकांना नेमक काय द्यायचं आहे त्याचा विचार करून केवळ मनोरंजनात्मक बारी करू नये. भजनात नवनवे प्रकार येत असले तरी भजनाची पारंपरिकता बुवांकडून जोपासली जावी, असे ते म्हणाले.भजनातून समाज प्रबोधनाची चळवळ उभी राहावी४भजनातून, नामस्मरणातून समाज प्रबोधन व्हावे हा खरा भजनाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे अलीकडील काही वर्षात भजनी बुवांनी वायफळ बतावणी तसेच अश्लील शेरेबाजीचे प्रमाण कमी करून समाज प्रबोधनाकडे वळले आहेत. ४भजनी बुवांनी रसिकांना भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची चळवळ उभी करावी, असे आवाहन लोकरे यांनी केले. ‘नारायणी नमोस्तुते’ने ओळख दिलीलोकरे बुवांची लोकप्रिय ठरलेल्या ‘नारायणी नमोस्तुते’ कॅसेटच्या यशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘नारायणी नमोस्तुते’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचता आले. त्यामधील आरती, भजन, रूपक, गजर, अभंग, गौळण, आदी प्रकारच्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. विशेषत: सिंधुदुर्गात भगवान लोकरे हे नाव नारायणी नमोस्तुतेच्या माध्यमातून लोकप्रिय झाले. त्यामुळे भजन क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होण्यास जिल्हावासीयांचे आशीर्वाद आहेत. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन, असेही ते म्हणाले.