शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गला पर्यटन ओळख शिवसेनेनेच दिली

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

शंकर कांबळी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे केले कौतुक

सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळत असून, पर्यटन जिल्हा म्हणून खरी ओळख शिवसेनेनेच जिल्ह्याला दिली आहे, असे उद्गार माजी आमदार शंकर कांबळी यांनी काढले. ते सावंतवाडी पर्यटन महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल आदींनी उपस्थित राहत पर्यटन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेने शहराला एक पर्यटनाचा वारसा दिला आहे. गेली ११ वर्षे पर्यटन महोत्सव आयोजित करणे शक्य नाही. पण ते पालिका करीत आहे. या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घोषणा केली आहे. त्यानंतर हा जिल्हा नेहमीच विकासाच्या प्रतिक्षेत राहिला. मात्र, आता पुन्हा एकदा जिल्ह्याचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार राजन तेली यांनी नगरपालिकेने आपले सातत्य नेहमी ठेवून महोत्सव साजरा केला. सावंतवाडी आधी सुंदर होतीच. मात्र, नगरपालिकेने दर्जेदार प्रकल्प राबवत आणखी सुंदर केली. त्यामुळे पालिकेला भविष्यातही लागणारी सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी सावंतवाडीप्रमाणेच वेंगुर्लेमध्येही जानेवारी किंवा फेबु्रवारीमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी कुबल यांनी केली. यावेळी नगरसेविका स्रेहा कुबल, शर्वरी धारगळकर, अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू उपस्थित होते. (प्रतिनिधी)भक्ती संगीताबरोबरच नाट्यसंगीताची मेजवानीसावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायिका साधना घैसास व सारेगम फेम नचिकेत देसाई या दोघांनी भक्तीसंंगीत व नाट्यसंगीताच्या तालावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तीसंगीतात दत्ता दिगंबरा दिगंबरा..., तर विविध नाट्यसंगीत सादर केली. यावेळी प्रख्यात तबलावादक साई बँकर यांनी कार्यक्रमात चांगलीच जान भरली. त्याचे श्रोत्यांनी चांगलेच कौतुक केले. तर सावंतवाडीतील नीलेश मेस्त्री यांनी हार्माेनियमची सुंदर साथ यावेळी दोघांनाही दिली. निवेदक शित्रे यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली. त्यांनी सावंतवाडीतील रसिकांनी आतापर्यंत कला जिवंत ठेवल्याची सांगितले होते. तशी कला आजही जिवंत असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आल्याचे त्यांनी सांगितले.