शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वेंगुर्लेत १६ दिवसांचा शिमगोत्सव

By admin | Updated: March 12, 2015 00:04 IST

होळी उत्सव : वेगवेगळ्या प्रकारची सोंगे ठरतात आकर्षण

वेंगुर्ले : जिल्ह्यात ५ मार्चपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. काही गावांचे शिमगोत्सव प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे संपलेही असतील. पण वेंगुर्ले गावाने होळी उत्सवातही आपले वेगळेपण राखले आहे. यावर्षी वेंगुर्ले परिसरातील शिमगोत्सव १६ दिवस म्हणजेच अमावस्येपर्यंत चालणार आहे. वेंगुर्ले पूर्वस मंदिर येथे होळीचा मुख्य मांड आहे. होळी दिवशी इथे देव होळी व गाव होळी अशा पोफळीच्या दोन होळ्या उभ्या केल्या जातात. गावातील प्रत्येक वाड्यात होळी असली, तरी लोक या मांडावर न चुकता हजेरी लावतात व होळीला यथाशक्ती नवस बोलतात. वाड्यातील रोंबाटेही पहिल्यांदा या मांडावर येतात व नंतर आपापल्या वाड्यांमध्ये फिरतात. दरवर्षी इथल्या शिमगोत्सवाचे दिवस बदलत असतात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येला वेंगुर्ले गावच्या शिमगोत्सवाची सांगता होते. त्यामुळे कधी १४, १५ तर कधी १७ दिवस हा शिमगोत्सव चालतो. यावर्षी १६ दिवस शिमगोत्सव चालणार आहे. शिमगोत्सव सुरू झाला की, लोक वेगवेगळ्या प्रकारची सोंगे करमणूक करीत शबय मागतात. पूर्वीपेक्षा शबय मागण्याचे प्रमाण शहरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. सुशिक्षित पिढी हा प्रकार अंगिकारण्यास नाकारत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक आपला शिमगा आटोपून वेगुर्ले येऊन लोकांची करमणूक करीत शबय मागत आहेत. अलिकडेच कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील असेच मेळ वेंगुर्लेत दाखल होत आहे. वाघ, सिंह, कोल्हा, राक्षस, मारुती व लेझीम खेळणारी लहान मुले असा लवाजमा विविध गाण्यांच्या चालीवर नृत्य करून येथील नागरिकांची वाहवा मिळवत आहेत. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, हाईक आदी इंटरनेटच्या जमान्यातही नेरूर येथील लहान मुले शिमगोत्सवात करमणूक करण्याचा वारसा जपत आहेत, ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. येथील नागरिकही त्यांचा यथोचित पाहुणचार करून प्रोत्साहन देत आहेत. नेरूरची ही सोंगे लहान मुलांना तर पर्वणीच ठरली आहेत. बाजारपेठ, मंदिर तसेच आग्रहाखातर लोकांच्या घरी जाऊन करमणूक करीत असतात. अगदी २-३ दिवसांपूर्वीच एक अंध लोकांचा ग्रुप येऊन गाणे म्हणत शबय मागत असल्याचे निदर्शनास आले. खेदाची गोष्ट म्हणजे, पूर्वीप्रमाणे गॅसबत्तीच्या उजेडात नृत्य करणाऱ्या ‘राधे’चे दर्शन मात्र दुर्मीळ झाल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)धुळवडीने २0 मार्चला होणार सांगतापंचक्रोशीतील लोकांना, अंध, अपंगांना आपली कला सादर करण्याची संधी देणारा वेंगुर्लेच्या या शिमगोत्सवाची सांगता २० मार्च रोजी धुळवडीच्या कार्यक्रमाने होणार आहे. पूर्वस मंदिर येथे रात्री परंपरेनुसार वाड्याची रोंबाटे एकत्र येऊन धूळ मारल्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालून उत्सवाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी सध्या प्रत्येक भागात रोंबटाचे कार्यक्रम होत आहेत.