शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सामायिक सातबाराधारकांना तिसरे अनुदान ठरणार वरदान

By admin | Updated: November 5, 2015 00:20 IST

निधी मंजूर : नुकसानभरपाई घेऊन जाण्याचे आवाहन...

सुभाष कदम===चिपळूण अवेळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. ज्यांचे सातबारा एकेरी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु, सामायिक सातबारा उतारे असणाऱ्या बागायतदारांना आता तिसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाईवर अवलंबून राहावे लागणार आहे. ही रक्कम मंजूर झाली असून, लवकरच ती बागायतदारांना मिळणार आहे. डिसेंबरनंतर आंबा व काजूच्या झाडांना मोहोर येतो. त्यानंतर फळधारणा होण्याच्या काळातच गेल्यावर्षी पाऊस पडला होता. त्यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून गेला होता. उरल्यासुरल्या मोहोरावर फळधारणा झाली होती. परंतु, जानेवारीनंतर पडलेल्या वादळी पावसाने त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच यावर्षीचे आंबा व काजूपीक हातचे गेले होते. त्यामुळे बागायतदार, शेतकरी हवालदिल झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मागणी सुरु झाली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन नुकसानभरपाई जाहीर झाली. ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने त्यांचे संमतीपत्र किंवा प्रत्येकाचे बँक खाते मिळणे गरजेचे होते. अनेकांनी आपले खाते नंबर किंवा काहींनी आपले प्रस्ताव तलाठ्यामार्फत जमा केले. त्यांना लाभ मिळाला. परंतु, ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे खातेदार या भरपाईपासून वंचित राहिले.या खातेदारांना आता तिसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे. वैयक्तिक लाभार्थींना मिळाला लाभचिपळूण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर ६२ लाख ६१ हजार २५० रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक लाभार्थींना लाभ देण्यात आला. पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये अनुदान प्राप्त. दुसऱ्या टप्प्यात ६२ लाख ६१ हजार २५० रुपये अनुदान प्राप्त. तिसऱ्या टप्प्यात १ कोटी १६ लाख ८७ हजार १२० रुपये अनुदान येणे बाकी. आतापर्यंत वैयक्तिक सातबाराधारकांना अनुदान प्राप्त. सामायिक सातबाराधारकांना तिसऱ्या टप्प्यात मिळणार न्याय.