शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: February 2, 2015 23:50 IST

चिपळूणचा प्रश्न : तातडीने लक्ष दिले तर प्रश्न सुटेल

चिपळूण : सध्या शहर व परिसरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहात असून, सांडपाणी वाहून नेण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोवळकोट भागात नाल्याच्या बाजूला भराव टाकला जात असल्याने या प्रकाराकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.चिपळूण शहरात भुयारी गटार योजना राबवण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अजूनही कागदावरच आहे. शहरातील काही कौलारु घरे आता सिमेंटची होत आहेत, तर काही भागात हौसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक सोसायटीने सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था करणे काळाची गरज असताना सांडपाणी नगर परिषदेच्या गटारांमध्ये सोडले जात आहे.चिपळूणचा सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. सध्या काही बिल्डर गोवळकोटसारख्या भागाकडे आकर्षित झाले असून, या भागातही इमारती उभ्या राहात आहेत. गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नैसर्गिक नाल्याशेजारी एका इमारतीचे बांधकाम वेगात सुरु आहे. मात्र, नाल्याच्या बाजूलाच मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने भविष्यात या मार्गावरील सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गोवळकोट परिसरात एक नैसर्गिक नाला असून, नगर परिषद प्रशासनाने इमारतीला परवानगी देताना हा नाला बंद होणार नाही, याची दक्षता घेऊन परवानगी देणे आवश्यक होते. नैसर्गिक नाल्यांच्या काही जागा या खासगी मालकांच्या असून, हे नाले-पऱ्हे प्रशासनाने आपल्या ताब्यात न घेतल्याने भविष्यात या भागातील सांडपाणी प्रश्नही गंभीर होण्याची चिन्ह दिसत आहेत. रहदारीच्या मार्गावर असणारा हा नाला बंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या नाल्यातील पाणी रस्त्यावर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी नाल्यावर बांधकामे सुरू असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. गोवळकोट, रावतळे, पेठमाप. शंकरवाडी भागात असे प्रकार होत असल्याने तेथील नैसर्गिक नाल्यावर काही बांधकामे होत असल्याने तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आता येथे चौकशीची मागणी केली जात आहे. चिपळूण शहराच्या गोवळकोट भागात असलेला नैसर्गिक नाला बुजवून जे बांधकाम झाले आहे, त्याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीकडे लक्ष न दिल्याने असे प्रकार वाढत आहेत. या प्रकाराना आळा बसावा, यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)