शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

सरकारी भात शिजता शिजेना!

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

खरेदी-विक्री संघांची गोडाऊन भरली : जिल्ह्यातील १६ गोदामांमध्ये तीन कोटींहून अधिक किंमतीचा भात पडून

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को. आॅप. मार्केटिंग फेडरेशने गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून २४ हजार ४९८.४६ मेट्रीक टन भात संकलन केले होते. सुमारे तीन कोटी २0 लाख रूपयांहून अधिक किंमतीचे हे भात भात तालुका खरेदी-विक्री केंद्रामध्ये अद्याप पडून असतानाही, चालू वर्षी भात संकलन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे आदेश जारी करण्यात आले असले, तरी गतवर्षीच्या संकलित करण्यात आलेल्या भात साठवणुकीमध्येच गोडाऊनची क्षमता संपल्याने खरेदी-विक्री संघांनी यावर्षी भात संकलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी फेडरेशनकडून जिल्ह्यातील एकूण १६ खरेदी विक्री संघातर्फे १९५९ शेतकऱ्यांकडून २४४९८.४६ मेट्रीक टन भात खरेदी केले होते. सर्वसाधारण भातासाठी टनाला १३१० रूपये दर व २०० रूपये बोनस देण्यात आला होता, तर ‘अ’ वर्गाकरीता १३४५ रूपये दर देण्यात आला. त्यामुळे खरेदी-विक्री संघांच्या गोडाऊनमध्ये पडून असलेल्या भाताची किंमत ३ कोटी २० लाख ९२ हजार ९८२ रूपये इतकी आहे. एवढ्या किंमतीचे भात पडून असतानाही, शासनाने चालूवर्षी भात खरेदी करण्याचा आदेश दिल्याने खरेदीविक्री संघ चालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. संकलित केलेले भात तसेच पडून असल्याने, त्याच्या वजनात घट होण्याची शक्यता तर आहेच, शिवाय दमट हवामानामुळे भातावर प्रक्रिया केली गेली, तर त्या भाताचा जास्तच तुकडा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित व्यवहारात शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरी शासनाचे नुकसान झाले आहे. शिवाय शिल्लक भातामुळे गोडाऊनची क्षमता संपून गेली आहे. त्यामुळे, नवीन भात संकलन करून ठेवायचे कोठे, हा खरेदी विक्री संघांसमोरील मोठा प्रश्न आहे. संकलित केलेले भात तसेच पडून असले, तरी भाताच्या खरेदीसंदर्भात सूचना करण्यात आल्याने याबाबत विशेष लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. या ठिकाणी असलेले भात व गोडाऊनमध्ये साठवण करण्याची व्यवस्था या दोन्हीबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे एकंदर सर्व स्थितीवरून स्पष्ट होत आहे. वजनात घट होण्याची शक्यता फेडरेशनच्या माध्यमातून भात संकलन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते प्रोसेसिंग मीलला पाठविण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात प्रोसेसिंग मिलचा अभाव असल्याने कोल्हापूर किंवा रायगड जिल्ह्यात पाठविण्यात येते. अखंड तांदूळ अपेक्षित असल्याने संबंधित तांदूळ जिल्ह्यातील रेशनकार्डावर विक्रीस पाठविण्यात येतो. गतवर्षीच्या भातावर प्रक्रिया करताना वजनात घट होण्याबरोबरच तांदळाचा तुकडा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दर्जाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे ई-टेंडर प्रणालीचा अवलंब राज्य शासनाने ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र स्टेट को आॅप. मार्केटिंग फेडरेशन लि.व्दारे गतवर्षी (२०१३-१४) खरेदी करण्यात आलेल्या भातासाठी ई-टेंडर प्र्रणालीचा अवलंब करून प्रोसेसिंगकरिता पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ई-टेंडर प्रणाली अवलंबिण्यात येणार आहे. त्यामुळे, गतवर्षीचे गोडाऊनमध्ये संकलित करून ठेवण्यात आलेल्या भातावर लवकरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे जिल्ह्यास २७ हजार मेट्रीकटनचे उद्दिष्ट यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यास भात खरेदीसाठी २७ हजार मेट्रीकटनचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी २५ हजाराचे लक्ष्यांक असताना २४ हजार ४९८.४६ मेट्रीकटन भात संकलन करण्यात आले होते. यावर्षी सर्वसाधारण भातासाठी टनाकरिता १३६० रूपये, तर ‘अ’ वर्गासाठी १४०० रूपये दर देण्यात येणार आहे. मात्र गोडाऊनची साठवणूक क्षमता नसल्यामुळे संघानी खरेदीसाठी असमर्थता दर्शविली आहे... जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर गतवर्षी खरेदी केलेले व गोडावूनमध्ये शिल्लक असलेले भात खरेदी शेतकरी भात केंद्र संख्या (मे.टन) खेड २७५ ४५३० दापोली १११ ९५३.६० केळशी १५३ १०७७.०१ गुहागर १९७ १६५९.६० रत्नागिरी १२२ ११०५.६० संगमेश्वर १७२ ५०७.६० लांजा १८ १२८.४० राजापूर १२८ १९९४.४० पाचल ९३ ११५६.८० चिपळूण ११८ २१६८.८० निवळी ३१ ५६०.४० मिरवणे १२५ २०२१.२० आकले ४१ ४४३.६० शिरगांव १९० १७८०.४० शिरळ ११३ १५०१.१० देवरूख ७२ ९०९.९५ एकूण १९५९ ४४९८.४६