शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात जहाजाच्या सिग्नलमुळे खळबळ

By admin | Updated: September 22, 2016 00:36 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क : कवडा रॉक परिसरातील प्रकार

मालवण : कवडा रॉक परिसरात १२ ते १५ वाव खोल समुद्र्रात अज्ञात जहाजाचे धोक्याचे संकेत (सिग्नल) मालवण व तळाशील येथील मच्छिमारांना दिसून आल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे. हे जहाज मालवाहू असण्याची शक्यता आहे. अद्ययावत संकेतप्रणाली बसविण्यात आलेल्या या जहाजाने तब्बल नऊवेळा सिग्नल दिले असल्याने हे सिग्नल धोक्याचे असल्याचे मालवण येथील प्रत्यक्षदर्शी मच्छिमारांनी सांगितले. मच्छिमारांनी या घटनेची माहिती मालवण पोलिसांना दिली आहे. हे जहाज दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील वेंगुर्ले, तसेच निवती समुद्रात या जहाजाचा मोठा आवाज आल्याने तेथील मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे जहाज मालवण किनारपट्टीवर दाखल झाले असून, अंधार पडल्याने जहाज नेमके कसले आहे, हे सांगणे कठीण होते. मात्र, रात्री ८ वाजता या जहाजाने चार पिवळे, दोन हिरवे, तर तीन लाल सिग्नल दाखविल्याचे सांगण्यात आले. हे जहाज १० ते १५ वाव खोल समुद्र्रात असून, आचऱ्याच्या दिशेने संथ गतीने पुढे सरकत असल्याची माहिती तळाशील येथील मच्छिमारांनी दिली. याबाबत मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधून माहिती दिली आहे. (प्रतिनिधी) जहाज कोस्ट गार्डचे याबाबत मच्छिमारांनी माहिती घेतली असता हे जहाज मालवाहू नसून ते कोस्टगार्ड विभागाचे असल्याचा संदेश आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र्र शिंदे यांना मिळाला आहे. किनारपट्टीवरील मच्छिमारांनी घाबरू नये, असे आवाहन करताना हे जहाज रात्रीचे पेट्रोलिंग करण्यासाठी आले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून सागरी सुरक्षेसाठी कोस्ट गार्ड यंत्रणेकडून समुद्रात पेट्रोलिंग व्हावे, अशी मागणी होती. तशा पद्धतीचे हे पेट्रोलिंग असू शकते, असे तोरसकर यांनी सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती. सिग्नल कशासाठी? हे जहाज नेमके कोणते होते, हे अंधारामुळे समजणे कठीण झाले असले तरी जहाजाने सिग्नल नेमके कशासाठी दिले? जहाजाच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला का? याबाबत मच्छिमारांमध्ये संभ्रम असून, समुद्र्रात वादळसदृश स्थिती असल्याने या जहाजाने किनारपट्टीचा आसरा घेतला तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या घटनेमुळे जिल्हा सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.