शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: August 19, 2015 22:57 IST

निला नायर : कालवा संवर्धन उपक्रमाबाबत वाडातर बैठकीत मार्गदर्शन

देवगड : पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारच्या कालवा संवर्धन अभिनव उपक्रमांची सुरूवातच पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिकांना चांगली उपजिविका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परदेशात याची विक्री करण्यासाठी खाडी पात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उपक्रमासाठी बचतगटातील महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत समुद्र उत्पादक व निर्यात विकास प्राधिकरण भारत सरकारच्या अध्यक्षा श्रीमती निला नायर यांनी व्यक्त केले.वाडातर येथील सुधीर जोशी यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच उल्का जोशी, मुख्य वनरक्षक कांदळवन कक्ष एन. वासूदेवन, समुद्र उत्पादक व निर्यात विकास प्रधीकरण भारत सरकारचे उपसंचालक अनिल कुमार, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट डॉ. सुबिर घोष, रोहीत सावंत, वनक्षेत्रपाल एम. एस. शेळके, सोहेल जमादार, अन्वेश्वर भंगे, दुर्गा सावंत, दया पत्की, नाबार्ड उपव्यवस्थापक अ‍ॅनी अलेक्झेंडॉर, दाजी पवार, उमेश परब आदी उपस्थित होते.नायर यांनी महिला बचतगटाशी संवाद साधून हा उपक्रम कशा पद्धतीने राबवत असून त्याचा विविधतेचा अनेक प्रकारचा उलघडा करून याविषयी संपूर्ण माहिती घेतली व प्रसिद्ध महिला बचतगटाला याविषयक मार्गदर्शन केले. मच्छि वाळवून ती विकणे हा सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार महिलांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व अनिर्बंध यांत्रिक मासेमारी यामुळे गेल्या ५-६ वर्षापासून कोकण किनारपट्टी क्षेत्रात कमालीचा मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. साहजिकच पारंपरिक मच्छिमारांसमोर रोजगाराचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर वाडातर येथील प्रसिद्धी महिला बचतगटाने कालवा संवर्धन प्रकल्प यशस्वी करून रोजगाराचा नवा व सुलभ मार्ग मच्छिमार महिलांना दाखवून दिला आहे.प्रसिध्दी महिला बचत गट यांच्याशी संवाद साधताना हा उपक्रम कशाप्रकारे यशस्वी केला याचा उलघडा त्यांनी केला. वाडातर येथील प्रसिद्धी महिला बचतगटाने कांदळवन कक्ष, मुंबई व युएनडीपी यांच्यामार्फत हा कालवा संवर्धन प्रकल्प तेथील खाडीत राबविला. केवळ १५ महिन्याच्या कालावधीत या प्रकल्पातून बचत गटाला दीड लाखांचे उत्पादन मिळाले. हा प्रकल्प राबविताना ३० बांबूचा मंडप खाडीत उभारण्यात आला. त्यानंतर एका रोपाला पाच पाच कालवांची रिकामी खरपे बांधून तळाला वाळू चूना लावलेले कौल बांधण्यात आले. असे ३०० ते ३५० रोप खाडीत उभारलेल्या बांबूच्या मंडपाला बांधण्यात आले. पंधरा महिन्यांच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या खरप्यांना शेवाळ पकडणार नाही याची काळजी महिला बचतगटातील सदस्यांनी घेतली. पंधरा महिन्यानंतर खाडीतील बांबूच्या मंडपाला बांधलेले रोप बाहेर काढले असता एका एका रोपाला १० ते २५ कालवे धरली होती. २५० ग्रॅम वजनाचे एक कालव होते. केवळ १६ हजाराच्या खर्चात या कालव संवर्धन प्रकल्पातून सहा हजार कालवे मिळाली. या कालवांना एका डझनला अडीचशे रूपये एवढा दर मिळाल्याने केवळ १६ हजाराच्या गुंतवणुकीतून बचतगटाला सव्वा लाखाचे विक्रमी उत्पन्न मिळाले.पावसाळयात पाणी गोड झाल्याने कालवे निर्जीव होतात. त्यामुळे त्यांना चांगला दर मिळत नाही. मात्र आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये अंडी धरण्याच्या कालावधी असल्याने कालवांचे मिळणारे उत्पादन हे दर्जेदार असते. त्यामुळे या कालवांना चांगला दर मिळतो. पावसाळयात कालवांना डझनाला १५० रूपये दर मिळत असताना हाच दर आॅक्टोबरनंतर डझनाला ३०० ते ३५० रूपये मिळत असल्याचे महिला बचतगटाच्या अध्यक्षा कस्तुरी ढोके यांनी सांगितले.प्रसिद्धी महिला बचतगटाच्या अध्यक्ष कस्तुरी ढोके, सायली फडके, भावना जुवाटकर, अनुष्का ढोके, प्रज्ञा ढोके, सायली वाडेकर, शुभदा जूवाटकर, संध्या पडेलकर, संजना भाबल, पार्वती जुवाटकर, दिपीका भाबल, सुलभा जावकर या सदस्यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. (प्रतिनिधी)दक्षता घ्यावीआंतरराट्रीय बाजारपेठेत कालवा उपलब्ध झाल्यास त्यांना डझन मागे ३०० ते ४०० रूपये उत्पन्न मिळू शकते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविताना खाडीच्या नदीपात्रात अशुद्ध पाणी मिसळणार नाही याची दक्षता घेण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले.