शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

शाळांचे दुसरे सत्र ठरणार धावपळीचे!

By admin | Updated: November 23, 2015 00:30 IST

विविध उपक्रम : दिवस कमी कार्यक्रम जास्त

टेंभ्ये : शाळांचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरु होत आहे. परंतु, इ. १० वी व १२वीच्या परीक्षांना जेमतेम ८० ते ९० दिवस शिल्लक रहात असल्याने हे सत्र धावपळीचे ठरणार आहे. या सत्रामध्येच शाळांचे अनेक अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रम असतात. त्याचबरोबर १० वी, १२ वीच्या तोंडी परीक्षा, प्रकल्पकार्य या सर्वांमुळे शाळांची अवस्था ‘रात्र थोडी व सोंग फार’ अशी होणार आहे.शैक्षणिक वर्ष २०१४-१५चे दुसरे सत्र सोमवार दि. २३पासून सुरु होत आहे. यावर्षी दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा करून सराव घेणे अपेक्षीत असते. विद्यार्थ्यांची परीक्षांच्या दृष्टीकोनातून तयारी करुन घेण्यासाठी हा कालावधी महत्वाचा मानला जातो.दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा महोत्सव भरवला जातो. यासाठी किमान ३ ते ५ दिवस लागतात.समाजसेवा शिबिरांचे आयोजन यादरम्यान केले जाते. अनेक शाळा डिसेंबर, जानेवारी महिन्यात वनराई बंधारे बांधतात. शाळांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजनही डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांच्या दरम्यान केले जाते. अनेक शाळांचे स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दि. २६ जानेवारीला आयोजित केले जातात. या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रातील पहिली घटक चाचणी व १० वी, १२ वीच्या पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या सर्व शैक्षणिक उपक्रम व परीक्षांसाठी किमान २५ ते ३० दिवस लागतात. उर्वरित दिवसांमध्ये दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम व १० वी, १२ वीच्या तोंडी परीक्षा, प्रकल्पकार्य पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र इ. १०वी व १२वीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. या सत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा कालावधी असल्याने प्रत्येक दिवसाचे शैक्षणिक मूल्य लक्षात घेऊन याचा वापर करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी केले आहे. (वार्ताहर)बोर्ड परीक्षेच्या तयारीचा कालावधी - किरण लोहारदुसरे सत्र म्हणजे विशेषत: इ. १०वी व इ. १२वी परीक्षेच्या अंतिम तयारीचा कालावधी मानला जातो. या कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी आवश्यक असते. या दरम्यान असणारे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहेत. या शैक्षणिक वर्षात दुसरे सत्र लहान असल्याने शाळांना व शिक्षकांना काटेकोरपणे वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. या सत्रातील इ. १० वी, १२ वीच्या दृष्टीने कामाच्या दिवसांची संख्या जेमतेम ८० ते ९० दिवस भरणार आहे. यावर्षी अधिक महिना आल्याने गणेशोत्सव, दीपावली हे सण जवळपास एक महिन्याने पुढे ढकलल्याने पहिले सत्र मोठे तर दुसरे सत्र जवळपास एक महिन्याने कमी झाले आहे. या सत्रामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम शाळांमध्ये राबविले जातात.