शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्कुबा डायव्हिंग वाद भडकणार?

By admin | Updated: December 2, 2015 00:44 IST

परवानाधारक उपोषणाच्या पवित्र्यात : विनापरवाना व्यावसायिकांवर कारवाई होणार

मालवण : मालवण किनारपट्टीवर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले स्कुबा डायव्हिंग अधिकृत-अनधिकृत हा वाद पुन्हा एकदा भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मालवण बंदर जेटी येथे परवानाधारक स्कुबा डायव्हिंग व्यवसाय सुरू असताना देवबाग येथे अनधिकृत स्कुबा डायव्हिंग व्यवसायिकांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्था व्यावसायिकांनी घेतला आहे.अनधिकृत व्यावसायिकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत परवाने घ्यावेत; अन्यथा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कारवाईचा इशारा तहसीलदार वनिता पाटील यांनी यापूर्वीच दिला होता. ३० नोव्हेंबरची मुदत संपली असल्याने अनधिकृत व्यावसायिकांनी परवाने मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवावा; अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी तयारी स्कुबा डायव्हिंग अधिकृत संस्था व्यावसायिकांनी केली आहे. अनधिकृत स्कुबा डायव्हिंग सुरु राहिल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय परवानाधारक व्यावसायिकांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)कोणत्याही क्षणी कारवाई : तहसीलदारतहसीलदार वनिता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, अनधिकृत व्यावसायिकांना परवाने घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानंतरही हा व्यवसाय विनापरवाना सुरु असेल तर कोणत्याही क्षणी योग्य अशी कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर पर्यटकांची सुरक्षा व परवाने घेऊन अधिकृत व्यावसायिकांनी व्यवसाय करावा, असेही सांगण्यात आले आहे.