शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा

By admin | Updated: April 17, 2017 23:37 IST

देवबाग, तळाशीलमध्ये क्षारयुक्त पाणी : किनारपट्टीभागात होणार टँकरने पाणीपुरवठा, तालुक्यात भूजल पातळी वाढली

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच काही भागात पाण्याची मोठी समस्या भासते. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने तसेच पंचायत समितीच्यावतीने चोख नियोजन राबविण्यात आल्याने मालवण तालुक्यात किनारपट्टीचा भाग वगळता यंदाच्या वर्षी पाणीटंचाईच्या झळा तितक्याशा जाणवू लागल्या नाहीत. तालुक्यातील काही गावांमध्ये नळपाणी योजनेच्या समस्या उद्भवू लागल्या असल्या तरी भीषण पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. मात्र, गेली काही वर्षे मार्चपासून किनारपट्टीवरील क्षारयुक्त पाण्याच्या समस्येला पर्याय उपलब्ध करून देणे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य राहणार आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षारयुक्त पाण्याची मोठी समस्या उभी आहे. क्षारयुक्त पाणी पिण्यास योग्य नसल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. दुसरीकडे काही गाव वगळता पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने पाणीटंचाईवर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. मालवण तालुक्यातील पाणी टंचाईच्या निवारणार्थ मालवण पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषेदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आलेल्या आराखड्यातील २५ कामाना मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील आचरा जामडूलवाडी येथील एक काम हे राष्ट्रीय पेयजलमधून घेण्यात आले आहे. यात नळयोजना दुरुस्त करणे - मठबुद्रुक लिंग्रसवाडी, चाफेखोल गोसावीवाडी, निरोम भरडवाडी, मसुरे मर्डे, मालोंड गावठाणवाडी, आनंदव्हाळ कदमवाडी, वराड बौद्धवाडी, राठीवडे पुजारेवाडी या कामाचा समावेश आहे. विंधन विहीर विशेष दुरुस्तीमध्ये घुमडे घाडीवाडी, हडी भटवाडी, हडी देऊळवाडी, हडी गडगेवाडी, हडी गावकरवाडी, वायंगवडे धनगरवाडी या कामांचा समावेश आहे. नवीन विंधन विहिरीमध्ये बांदिवडे खोरेवाडी, बुधवळे कुडोपी बौद्धवाडी या कामांचा समावेश आहे. तात्पुरती पूरक नळपाणी योजनेत वराड भरडवाडी, महान घाडीवाडी, आचरा जामडूल या कामांचा समावेश आहे. विहीर खोल करणे व गाळ काढणे तसेच सार्वजनिक विहीर दुरुस्ती करणे यात राठीवडे गोंजाचीवाडी, निरोम मांजरेकरवाडी, घुमडे घुमडाई मंदिर, कुंभारमाठ जरीमरीवाडी, निरोम देऊळवाडी, कोळंब कातवड, चाफेखोल मधली गावकरवाडी या कामांचा समावेश आहे. तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून खारट पाण्याची तीव्रता वाढत असल्याने त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. दरवर्षी प्रामुख्याने सर्जेकोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते. गतवर्षी तळाशील गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. किल्ले सिंधुदुर्गवरही उन्हाळी सुट्टीत पाण्याची समस्या भेडसावते. किल्ल्यात असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. पुरातत्त्व विभागाकडून सुरु असलेल्या तटबंदीचे कामही पाण्याअभावी थांबविण्यात आले आहे.