शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सातार्डा सरपंचाचा तडकाफडकी राजीनामा

By admin | Updated: June 30, 2015 00:17 IST

काँग्रेसवर नाराज : राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा

सावंतवाडी : सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा तीन दिवसांपूर्वी सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे सोपविला आहे. सातार्डा सरपंच म्हणून त्यांनी गेली अडीच वर्षे उत्तमरित्या काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसवर नाराज असल्याने सक्रिय राजकारणातून दूर होते. तसेच उत्तम स्टील कंपनीबाबतही त्यांचा लढा सुरूच होता.सातार्डा येथे सरपंच उदय परिपत्ये व सहकाऱ्यांनी मिळून कॉंग्रेसची सत्ता आणली होती. गेली अडीच वर्षे ते कॉग्रेसचे सरपंच म्हणून एकहाती सत्ता राबवत होते. या काळात उत्तम स्टील कंपनीने लोकांची कशी फसवणूक केली, तसेच ना हरकत दाखल्यावरून मंत्रालय पातळीपर्यत लढा सुरू ठेवला होता. या लढ्याला भाजप तसेच शिवसेना यांनीही त्यांना साथ दिली होती. मात्र, चार दिवसांपूर्वी त्यांनी अचानक आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवला आहे. राजीनाम्याचे कारण मात्र समजू शकले नाही. पारिपत्ये हे गेले सहा महिने सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांना काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. आता पारिपत्ये यांच्या राजीनाम्यानंतर सातार्डा सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)पुढच्या निर्णयाबाबत अद्याप काही नाहीयाबाबत उदय पारिपत्ये यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या सरपंचपदाच्या कारकिर्दीला अडीच वर्र्षे पूर्ण झाली. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसवर नाराज आहे. हे पूर्वीच सांगितले आहे. पण सध्या मी कुठल्याही पक्षात नाही. अद्याप पुढचा निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.