शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफिया अधिकाऱ्यांवर शिरजोर

By admin | Updated: July 30, 2014 22:58 IST

कांदळवनही भक्ष्यस्थानी : आरोंदा येथे भर पावसात वाळू उत्खनन

सुभाष परूळेकर ल्ल मळेवाडआरोंदा किरणपाणी भागात किनाऱ्यालगत गेले आठ दिवस वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन भर पावसाळ्यात आणि अधिकाऱ्यांच्या देखत सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या उत्खननावर स्थानिक महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याने गोव्यातील वाळू व्यावसायिक आरोंदा खाडी आंदण दिल्यासारखे वागत आहेत. यातील बहुतांशी उत्खनन हे कांदळवन परिसरात असून वनविभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोंदा भागात गेली कित्येक वर्षे बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. अनेकवेळा गोव्यातील वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तर प्रशासनाच्या अनेक कारवाया स्थानिक महसूल प्रशासनामुळे फसल्या आहेत. स्थानिक मंडळ अधिकारी तसेच तलाठी कोतवाल यांचे या वाळू व्यावसायिकांशी लागेबंधे असल्याने अनेकवेळा कारवाई करायच्यावेळी ते निसटल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत या खाडीत कोट्यवधीची वाळू उत्खनन करून नेण्यात आली आहे. मात्र, महसूल विभागाला यातील कवडीमोलाचा महसुलही देण्यात आला नाही. अनेकवेळा या व्यावसायिकांवर कारवाई करायची झाली की, गोवा व महाराष्ट्राच्या समुद्री हद्दीचा प्रश्न ऐरणीवर येतो. याचाच फायदा या व्यवसायिकांना मिळून ते निसटण्यात यशस्वी झाले आहेत. या वाळू व्यावसायिकांनी आतापर्यंत काढलेल्या वाळूमुळे समुद्रात करण्यात आलेल्या बांधकामानाही याचा फटका बसू लागला आहे.