शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या खातेफोडीवर निर्बंध कायम

By admin | Updated: December 1, 2015 00:21 IST

समस्या ‘जैसे थे’ राहणार : उपजिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन; हिर्लोक परिसरातील शेतकऱ्यांत संताप

कडावल : जमिनीच्या खातेफोडीवरील निर्बंध उठविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी हिर्लोक येथील समाधान योजनेच्या कार्यक्रमात केली होती. मात्र, टाळंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विस्थापितांचे अद्याप पुनर्वसन झाले नसल्याने लाभक्षेत्रातील खातेफोडीवरील निर्बंध उठविता येणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लेखी कळविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची मालिका ‘जैसे थे’ राहणार आहे. टाळंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विस्थापितांचे अद्याप पुनर्वसन झालेले नसल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमधील जमिनींची खरेदी-विक्री, खातेफोड, धडेवाटप आदी कामांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कित्येक वर्षे खातेफोड न झाल्यामुळे आज विभक्त झालेल्या अनेक कुटुंबांमधील सदस्यांची नावे एकाच सातबारावर नोंद झाली आहेत. त्यामुळे शासकीय योजना राबविताना शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. शासकीय योजनेमधून विहीर बांधणी, घरकुल बांधणी, फळझाड लागवड तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना राबविताना लाभार्थ्यांना अडचणीचे होते. हिर्लोक येथील समाधान योजनेच्या झालेल्या कार्यक्रमात धडेवाटपाच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन याबाबतचे निर्बंध उठविण्याची मागणी केली होती. तहसीलदारांनी हे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले होते. मात्र, खातेफोडीवरील निर्बंध उठविण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. याबाबत कार्यालयात कळविण्यात आलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, टाळंबा पाटबंधारे प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील समाविष्ट गावांतील आठ एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना जमीन विक्री तसेच हस्तांतरणास निर्बंध लावण्यात आलेले आहेत. बुडीत क्षेत्रातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील निर्बंध उठविता येत नाहीत. त्यामुळे धडेवाटपास मंजुरी देता येत नाही. (वार्ताहर)