शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ स्टेशनमास्तर धारेवर आरक्षण तिकिटाचा काळाबाजार

By admin | Updated: May 28, 2014 01:34 IST

राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

कुडाळ : कुडाळ रेल्वेस्थानकावर होणार्‍या आरक्षण तिकिटांच्या काळ्या बाजाराबाबत संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून धारेवर धरले. हा प्रकार न थांबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात आलेल्या प्रवाशांना आता परतीचे वेध लागले आहेत. प्रवास सुखकर होण्यासाठी तत्काळ कोट्यातून आरक्षण मिळविण्यासाठी कुडाळ रेल्वेस्थानकावर पहाटेपासून प्रवाशांची रांग लागत आहे. परंतु स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने भल्या पहाटे येऊनही प्रवाशांना आरक्षण तिकिटे मिळत नाहीत. काळा बाजार करणारे दलाल रात्रीपासूनच रांगेत जागा अडवून असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. दोन दिवसांपूर्वीच संतप्त प्रवाशांनी कणकवलीहून येथे आलेल्या रेल्वे पोलिसाला याबाबत जाब विचारला होता. महत्त्वाचे म्हणजे तिकिटांच्या काळ्या बाजाराची कल्पना असूनही रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी रेल्वे पोलीस उपलब्ध नसल्यामुळे सामान्यांची परवड होत होती. रेल्वे प्रशासनाच्या या उदासिन धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी कुडाळ राष्टÑवादीचे प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, प्रफुल्ल सुद्रिक, संजय भोगटे, भास्कर परब, जीवन बांदेकर, संग्राम सावंत, सूर्यकांत नाईक, छोटू पारकर, सदानंद सावंत यांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला. तिकिटांचा काळा बाजार थांबवा, कायमस्वरूपी रेल्वे पोलिसाची नियुक्ती करा, तसेच तिकीट घराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसावावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी स्टेशनमास्तर यांनी, रेल्वे तिकीट घराच्याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमण्यात येईल, तिकिटांचा काळा बाजार बंद होण्यासाठी उपाययोजना करू, असे आश्वासन दिले. यावेळी रेल्वेस्थानकावर पोलीस आणि रेल्वे पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. (प्रतिनिधी)