शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: December 7, 2015 00:19 IST

९ महिला, ८ पुरुष मिळून १७ सदस्य : दोन महसुली गावांचे सर्वेक्षण आज

कुडाळ : कुडाळ शहर नगरपंचायतीची अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर झाली असून, भविष्यातील नगरपंचायतीमध्येसुद्धा १७ सदस्य असणार आहेत. यामध्ये ९ महिला व ८ पुरुष असे उमेदवार असल्याचे या आरक्षण अधिसूचनेवरून निश्चित झाले आहे. तसेच या नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसुली गावांचे अनुसूचित जाती जमातीचे सर्वेक्षण आज, सोमवारी तत्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच सर्वेक्षण अहवालानंतरच नगरपंचायतीची प्रभाग रचना जाहीर होणार आहे .कुडाळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यासंदर्भात १० आॅगस्ट २०१५ रोजी जाहीर झाल्यानंतर या नगरपंचायतीकडे नगरपंचायतीची वॉर्ड रचना कशी असेल, आरक्षण कुठे पडणार याकडे राजकीय नेते, कुडाळवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून, प्रशासनाने या नगरपंचायतीची आरक्षण अधिसूचना जाहीर केली आहे. आरक्षण अधिसूचना जाहीर झाल्यामुळे (पान १० येथील राजकीय वर्तुळात आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणुकीसंदर्भात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरक्षणाची अंतिम मंजुरी प्रशासनाने दिली आहे. कुडाळ नगरपंचायत आरक्षण माहिती कुडाळ ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येणार आहे. या नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसुली गावांचे अनुसूचित जाती जमातीचे सर्वेक्षणही २०११ च्या लोकसंख्या जनगणनेनुसार होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कुडाळची लोकसंख्या १६ हजार १५ एवढी आहे. वॉर्डरचना करत असताना अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग यांचीही लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी) आरक्षणकुडाळ नगरपंचायतीची एकूण नगरसेवक संख्या ही १७ असून, यामध्ये महिला (९) पुरुष (८) असे नगरसेवक असल्याचे निश्चित झाले आहे. आरक्षणाचा विचार करता अनुसूचित जाती (१) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) (५) पैकी ३ महिला व २ पुरुष, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण उमेदवार ११, पैकी ६ महिला व ५ पुरुष असे आरक्षण असणार आहे.सर्वेक्षण अहवाल सोमवारीच होणार तयारकुडाळ शहरातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येचा अहवाल पूर्ण झालेला आहे. मात्र या नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसूली गावांच्या अनुसूचित आलेल्या जाती जमातीच्या लोकसंख्येचा अहवाल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नगरपंचायतीचे आरक्षण अधिसूचना जाहीर झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसूली गावांचे अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येचा अहवाल तत्काळ मागितला असल्याने सोमवार ७ डिसेंबर रोजी हे सर्वेक्षण नगरपंचायतीचे कर्मचारी करणार आहेत.प्रादेशिक संचालक,नगरपालिका प्रशासन तथा कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार कुडाळ नगरपंचायतीच्या जातनिहाय आरक्षणाबाबत अंतिम आरक्षण जाहीर केले असून तशी माहीती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कुडाळ नगरपंचायत प्रशासक सुरेश काशिद यांना शनिवारी कळविण्यात आली होती.