शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

वीज, रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी प्राप्त

By admin | Updated: June 26, 2014 00:09 IST

प्रमोद जठार : कणकवलीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक

कणकवली : सागरी किनारपट्टीच्या भागात वीजवाहिन्या उभारणे आणि जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी एकूण ५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आमदार प्रमोद जठार यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी केंद्रसरकारच्या अखत्यारितील प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. सागरी किनारपट्टीवर वीजवाहिन्यांचे काम करण्यासाठी २५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. किनारपट्टीच्या भागात जमिनीखालून वीजवाहिन्या टाकण्यात येणार असून अधिक निधी मिळाल्यास शहरी भागातही जमिनीखालून वाहिन्या टाकल्या जाऊ शकतात, असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१३ अखेर मंजूर ८४ शेतीपंपांची कामे आॅगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहेत. गंजलेले ८५३ विद्युत खांबही बदलण्यात येत असून पुणे येथील कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. कार्यालयाच्या दूरध्वनीवर तक्रारी न स्विकारता टोल फ्री क्रमांकावर स्विकाराव्यात असे वरिष्ठांचे आदेश असल्याने ग्राहकांनी वीजबिलावरील टोल फ्री क्रमांकावर तक्रारी कराव्यात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील तक्रारींसाठी ७८७५७६५०८४ आणि शहरासाठी ७८७५७६५१०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागासाठी २५ कोटींचा निधी आला आहे. यातून विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. आमदार जठार यांनी विभागांतर्गत रस्त्यावर कोणत्या ठिकाणी पूल उभारणे आवश्यक आहे याची मागणी केल्यास त्याचा पाठपुरावा करू, असे सांगितले. कृषी विभागाच्या आढाव्यात यंदा फळझाड लागवडीचे फक्त ४०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते किमान २ हजार हेक्टर करण्यात यावे. अनुदानीत साहित्याच्या यादीतून ग्रासकटर वगळण्यात आले आहे. त्याचा समावेश करण्यात यावा. तसेच अनुदानातून मोठ्या ट्रॅक्टरचा पुरवठा व्हावा, अशा सूचना मांडल्या. कणकवली व तळेरे येथे ट्रॉमा केअर सेंटर्स मंजूर झाली आहेत. त्यासाठी अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तळेरे येथे जागा उपलब्ध झाली नसल्याने काम सुरूच होऊ शकलेले नाही. तर कणकवली सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्यासाठी वैद्यकीय पदे मंजूर नाहीत, असे उपजिल्हा रूग्णालयाच्या डॉ.जाधव यांनी माहिती दिली. कासार्डे येथील आरोग्य केंद्राच्या आवारात जागा उपलब्ध असल्याचे सांगून आमदार जठार यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य विभागाने या जागेसाठी मान्यता दिल्याचे सांगितले. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर, परशुराम झगडे, रविंद्र शेटये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)