शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

राज्यात वन क्षेत्रात रत्नागिरीचा दुसरा क्रमांक

By admin | Updated: July 22, 2014 23:58 IST

पेटंट कायम : स्थानिकांना लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न

सुभाष कदम -चिपळूणजंगले वाढावीत, त्यांचे संवर्धन व्हावे, जंगलातील लहान लहान जीव सुखाने नांदावेत, जंगलातील पेटंट कायम राहून त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यात गडचिरोलीनंतर वनक्षेत्राच्या बाबतीत रत्नागिरीचा दुसरा क्रमांक लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र आहे. खेड तालुक्यात २५९४ हेक्टर, तर संगमेश्वरमध्ये २६७ हेक्टर वनक्षेत्र आहे. सर्वांत जास्त वनक्षेत्र खेडमध्ये, तर सर्वांत कमी वनक्षेत्र संगमेश्वरमध्ये आहे. येथे वन वाढवून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात. दरवर्षी लाखो नवीन झाडे लावली जातात. शासनस्तरावर जंगले वाचवण्यासाठी वनसंवर्धन अधिनियम १९८० तयार झाला आहे. याअंतर्गत जंगल कसे असावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्व आहे. वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षतोडीस परवानगी देणे व दंड आकारणे आदी गोष्टी येतात. या अधिनियमात १९८९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७नुसार तोडलेला माल वाहतुकीस परवानगी देता येते. १९६६चा जमीन महसूल अधिनियम महसूल विभागाकडे येतो. बिगर मनाई झाडांची तोड झाल्यास या अधिनियमाद्वारे कारवाई केली जाते. जैविक विविधता संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये कायदा केला आहे.या अधिनियमानुसार जंगल संवर्धनाचा हक्क स्थानिकांना मिळतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद आता ग्रामस्तरावर ठेवली जाणार आहे. ५\४रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र. ४ दरवर्षी लाखो झाडांची होते लागवड. ४वन वणव्याचा कोकणाला शाप.४ फासकीचे प्रमाण घटल्याने वन्य प्राण्यांना दिलासा. ४ जैविक विविधता कायद्यामुळे वनसंरक्षणाला मिळणार गती. ४ ग्रामपातळीवर वनसंवर्धनासाठी होणार समिती स्थापन. ४ गावागावात लोकजैविक नोंदवही तयार होणार. ४ वनसंवर्धन अधिनियमाचे होतेय काटेकार पालन. कोकणात वणव्याचे प्रमाण मोठे आहे. गवत जाळल्यानंतर किंवा जमिनीची मशागत केल्यानंतर चांगले पीक येते, असा समज आहे. त्यासाठी जंगलाला दरवर्षी आग लावली जाते. त्यामुळे आंबा, काजू बागांबरोबरच दुर्मीळ जातीच्या औषधी वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. सरपटणारे प्राणी, मुंग्या व लहान प्राणी जळून खाक होतात. यामुळे जैविक विविधतेला धोका निर्माण झाला आहे. वणवामुक्त गाव अभियान राबवून ग्रामस्थांनी शासनाला सहकार्य करायला हवे. वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी आता ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. - अमर साबळे,उपविभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण)