शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

राणे कुटुंबाने २५ वर्षांचे प्रगतीपुस्तक जाहीर करावे : अतुल काळसेकर

By admin | Updated: September 5, 2014 23:26 IST

उद्योगमंत्री नारायण राणे शासनाची डेअरीही वाचवू शकले नाहीत. उलट जठारांनी सुरू केलेला डेअरी प्रकल्प बंद पाडण्यासाठी हीन पातळीचे प्रयत्न केले

कणकवली : गेल्या २५ वर्षांत राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यात पेट्रोलपंप, जागा, बागा, हॉटेल व्यतिरीक्त कोणता विकास केला याचे प्रगतीपुस्तक जाहीर करावे आणि मगच जठारांवर टीका करावी, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे. येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे उपस्थित होत्या. नीतेश राणे यांनी आमदार जठार यांच्यावर टीका केली होती. काळसेकर म्हणाले की, उद्योगमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांचे प्रगतीपुस्तक आधी नीतेश राणे यांनी जाहीर करावे. उद्योगमंत्री नारायण राणे शासनाची डेअरीही वाचवू शकले नाहीत. उलट जठारांनी सुरू केलेला डेअरी प्रकल्प बंद पाडण्यासाठी हीन पातळीचे प्रयत्न केले गेले. कॉँग्रेसच्याच आमदार विजय सावंत यांच्या होऊ घातलेल्या साखर कारखान्याला टोकाचा विरोध नारायण राणे यांच्याकडून झाला. त्यांना जठारांच्या डेअरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उद्योगमंत्री असूनही मतदारसंघातील एमआयडीसी प्रकल्पाला राणे ऊर्जितावस्था आणू शकले नाहीत. सावंतवाडी येथील मिनी एमआयडीसीत किमान सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत. एमआयडीसीचे विश्रामगृह बांधून उद्योगांना ऊर्जितावस्था येणार नाही. उद्योगमंत्री असताना नारायण राणेंकडून राज्यातील नको किमान आपल्या मतदारसंघातील उद्योगांना बळ मिळेल अशी आशा होती. नीतेश राणे यांनी नोकरी एक्स्प्रेसचा भुलभुलैया निवडणुकीच्या तोंडावर आणला. या एक्स्प्रेसच्या जाळ्यात फसून अनेक तरूण-तरूणींना वैफल्य आले आहे. मराठी तरूणांनी उद्योग उभारावेत असे सांगणाऱ्या नीतेश यांनी या एक्स्प्रेसच्या माध्यमातून युवा वर्गाला जिल्ह्याबाहेर सात-आठ हजारांच्या नोकरीला पाठवले. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी पगाराचा बराचसा भाग राहणीमानासाठी खर्च होतो. या एक्स्प्रेसचा फज्जा कसा उडाला हे आम्ही पुराव्यानिशी जाहीर करणार आहोत. गत लोकसभा निवडणुकीत आम्ही विकास केला असा टेंभा मिरवणाऱ्या कॉँग्रेसची काय अवस्था झाली आहे यावरून येथील तथाकथित नेत्यांनी बोध घ्यावा, असे काळसेकर म्हणाले. (प्रतिनिधी)