शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेती संकटात- हळव्या, निमगरव्या पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम : वाघमोडे

By admin | Updated: August 1, 2014 23:17 IST

शेतकरी संभ्रमात : भात लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : जिल्ह्यात पेरणी वेळेत झाली. मात्र, यावर्षी पाऊस जुलैपर्यंत लांबल्यामुळे भात लागवडीला उशिरा प्रारंभ झाला. अद्याप लागवड सुरू आहे. परंतु लागवडीचा कालावधी लांबल्यामुळे रोपवाटिकेत फुटवे प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हळव्या, निमगरव्या भाताच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार असून, उत्पादन घटू शकते, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत शिरगावच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी व्यक्त केले.हळवे भात तयार होण्यासाठी २१ दिवस, निमगरव्या भातासाठी २५ दिवस, तर गरव्या भातासाठी २८ दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. जूनमध्ये लागलेल्या पावसावर भाताची पेरणी करण्यात आली. मात्र, एक महिनाभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे रोपांच्या वाढीवर परिणाम झाला. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. लागवड प्रक्रियाही लांबली होती. हळव्या भाताच्या रोपवाटिकेत फुटवे येण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. आषाढी एकादशीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर लागवड प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हळव्या जातीच्या भाताच्या रोपाला फुटवे येऊन फुलोरा येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरून ही प्रक्रिया दिसत नसली तरी आतून लोंबी येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हळव्या व निमगरव्या भाताच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गरव्या जातीच्या भाताला मात्र तितकासा धोका नाही. अद्याप भात लागवड सुरू आहे. विद्यापीठांतर्गत शिरगाव येथे १९१३ साली कृषी संशोधन केंद्राची स्थापना झाली. सुरूवातीला पटणी, पनवेल, वाकसाल, वरंगळ, सोरटी, कोलंब प्रकारचे भात शेतकरी लावत असत. १९६० ते ७३ हा काळ हरित क्रांतीचा होता. तायचुंग नेटीव्ह १ आणि आयआर ८ या जातीच्या जनुकांचे संकरीकरण करून रत्नागिरी २४ बारीक दाण्याची जात विकसीत करण्यात आली. भाताच्या नऊ सुधारित जाती (रत्नागिरी २४, रत्नागिरी ६८-१, रत्नागिरी ७११, रत्नागिरी ७३-१, रत्नागिरी १, २, ३, ४, ५) आणि एक संकरित जात (सह्याद्री ५) विकसीत करण्यात आली आहे.जमिनीचा पोत ओळखून अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसीत करण्यात आल्या आहेत. ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये वाढ होऊन ७७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. कोकणाची भात उत्पादकता १.८ टन प्रतिहेक्टर होती ती आता ३.४ टन आहे. पश्चिम महाराष्ट्राची उत्पादकता १.१२ वरून २.४९ इतकी झाली आहे. १७ मादी वाणाची निर्मिती केली असून, ज्याचा उपयोग सध्या संकरित बीज निर्मितीसाठी होत आहे.केंद्राने कोकण टपोरा व कोकण गौरव या भुईमुगाच्या जाती विकसीत केल्या आहेत. त्यामुळे वरकस व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत भुईमुगाचे पीक घेण्यात येत आहे. याशिवाय पांढऱ्या रंगाच्या नागलीची जात विद्यापीठाने विकसीत केली आहे. कारळा लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. सरबतासाठी अमृत कोकम ही जात केंद्राने विकसीत केली. केंद्राने लांब दाण्याच्या, अधिक प्रत असलेल्या आणि लाल दाण्याच्या संकरित भात वाणाचे संशोधन सुरू केले आहे. या तांदळामुळे लोह, कॅल्शियम, झिंक मिळणार असल्याचे डॉ. वाघमोडे यांनी सांगितले. नव्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना ़निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)दापोली : कोकणात गेल्या २८ वर्षांनंतर संपूर्ण जून महिना पहिल्यांदाच कोरडा गेला. यामुळे कोकणातील मुख्य उत्पादन असणारे भातपीक शेतकऱ्यांच्या हातातून निसटते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर यांनी कोकणातील भात शेतीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु शेतकऱ्यानी यापुढे भातशेतीची योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात जून महिन्यात पाऊस न पडल्याने पेरणी लांबली. काही शेतकऱ्यानी पेरणी केली होती, ती करपली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्या तुलनेत कोकणातील शेतकऱ्यांना तशा प्रकारची पेरणी करण्याची वेळ आली नाही. कोकणात साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो. त्यामुळे पावसाच्या पूर्वी धूळवाफेवर आणि पावसाच्या सुरुवातीला साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली जाते. पेरणी झाल्यावर २१ दिवसांनी रोपे तयार होतात. त्यानंतर रोपे लावली जातात. पेरणी वेळेत होऊनसुद्धा जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणीला उशीर झाला. लावणीला उशीर झाला असला तरीही रोपे जाग्यावर वाढल्यामुळे ती परिपक्व झाली होती. त्यामुळे कोकणातील भातरोपाची फारशी हानी झाली नाही. मात्र, काही भागात मॅट नर्सरीतील रोपे थोड्याफार प्रमाणावर करपली होती. अशा रोपांची काळजी घेण्याचा सल्ला विद्यापीठ शास्त्रज्ञांकडून देण्यात आला होता.यावर्षी जुलैअखेर लावणी सुरु आहे. शेतकऱ्यांना दोन ते तीन आठवडे उशीर झाला आहे. त्यामुळे उत्पन्नावर थोड्याफार प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. परंतु ते टाळणे शक्य आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यानी खताची मात्रा वाढविणे गरजेचे आहे. २५ ते ३० टक्के मात्रा वाढवल्यास पिकाचा कालावधी भरुन निघेल व उत्पन्नात होणारी घट टाळता येईल. त्यासाठी भातपिकावरील रोगाचीसुद्धा वेळेत काळजी घेणे गरजेचे आहे.कृषी विद्यापीठाने संशोधनातून भाताच्या नवीन जाती आधुनिक तंत्रज्ञान तयार केल्या आहेत. पारंपरिक पद्धतीची भातलावणी न करता विद्यापीठाने सुरु केलेल्या चारसूत्री पद्धतीने भात लावणी केल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होते. जून महिना कोरडा गेल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांची थोड्याफार प्रमाणात रोपे करपली होती. परंतु त्यानंतर पडलेल्या पावसाने ती परिस्थिती सुधारली. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान टळले, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी होऊ शकली नाही. त्यामुळे लावणी उशिरा झाली. याचा सर्वच भातपिकावर विपरित परिणाम होईल, असे म्हणता येणार नाही. परंतु पावसाअभावी उशिरा लावणी झाल्याने काही ठिकाणी उत्पन्नावर मात्र थोडाफार परिणाम होऊ शकतो. कारण प्रत्येक जातीच्या पेरणीचा व लागवडीचा कालावधी ठरलेला असतो. त्या वेळेत ते झाले नाही तर उत्पन्नावर थोडा परिणाम होऊ शकतो.- डॉ. उत्तमकुमार महाडकर, संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली