शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाटात दरड कोसळली--आठ तास वाहतूक ठप्प :

By admin | Updated: July 29, 2014 22:57 IST

मुसळधार पावसाचा फटका

कणकवली : मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील फोंडाघाटाला बसला असून, काल-सोमवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास या घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल आठ तासांनंतर कोसळलेली दरड हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.कोल्हापूर मार्गावर फोंडा बसस्थानकापासून सुमारे साडेनऊ किलोमीटर अंतरावर घाटात ही दरड कोसळली. या मार्गावरून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या एस.टी.तील प्रवाशांनी याबाबतची माहिती फोंडा येथील हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून दिली. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षालाही याबाबत कळविण्यात आले. हेल्प अकॅडमीचे राजन चिके, महेश सावंत, संजय पावसकर, बाळा नानचे, पिंटू पटेल, आना नानचे, विठ्ठल पिळणकर, आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठे दगड रस्त्यावर कोसळले होते. हा मार्ग मोकळा होण्यास बराच वेळ लागणार असल्यामुळे एस.टी. तसेच इतर वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पाणी व बिस्किटांचे वाटप त्यांनी केले.तहसीलदार समीर घारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. कन्नादासन, पोलीस निरीक्षक रानमाळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घाटात दाखल झालेल्या जेसीबीच्या साहाय्याने ही दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.आज, मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले होते. तत्पूर्वी या मार्गावरील वाहतूक गगनबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील दगड दूर करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (वार्ताहर)