शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पावसाचा जोर

By admin | Updated: July 10, 2016 23:48 IST

नदी, ओहोळांना पाणी : कसालजवळ झाडाची फांदी पडून वाहतूक ठप्प

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील अनेक नद्या तसेच ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. खारेपाटण येथील शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, तालुक्यात तुरळक घटना वगळता पावसामुळे कोठेही मोठी हानी झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात सायंकाळी उशिरापर्यंत झालेली नव्हती. तालुक्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंच्या २४ तासात ६८ मिमी. पाऊस झाला होता. आतापर्यंत तालुक्यात १६०५ मिमी पाऊस झाला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंच्या पावसाची मोजणी महसूल विभागाने केली असता, ४८ मिमी. पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नदी तसेच ओहेळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र पावसाच्या पाण्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद झाल्याची घटना कुठेही घडली नाही. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलाजवळून हिवाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंब्याची मोठी फांदी तुटून पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. (वार्ताहर)