शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात रेल्वे कर्मचारी ठार

By admin | Updated: November 5, 2015 00:01 IST

कोकिसरे फाटकाजवळील घटना : संतप्त जमावाकडून गाडीची नासधूस

वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकानजीक वळणावर स्कोडा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार रेल्वे कर्मचारी विजय गुणाजी टक्के (वय ४०, रा. खांबलवाडी, वैभववाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.संतप्त जमावाने अपघातानंतर गाडीची दगड घालून नासधूस केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. यामुळे कोकिसरे, वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.विजय टक्के रेल्वेत नोकरीला होते. त्यांची रेल्वेस्थानक परिसरात नेमणूक होती. सकाळी साडेसात वाजता विजय आपल्या दुचाकी (एमएच ०७ आर ७७३९)ने रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. रेल्वे फाटकानजीक वळणावर तळेरेकडून वैभववाडीच्या दिशेने येणाऱ्या स्कोडा कार (एमएच ०४ डीवाय १७०४)ने टक्के यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे ते सुमारे २० फुटांवर झुडपात फेकले गेले आणि दगडावर डोके आपटल्याने बेशुद्ध पडले. स्कोडा मालक कैजर गोदरेज कोटवाल (रा. मालाड, मुंबई) पत्नीसह गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, वाहतूक पोलीस अनमोल रावराणे, संजय खाडे, के. बी. बागुल, नितीन कदम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टक्के यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना टक्के यांचा मृत्यू झाला. सांयकाळी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद नव्हता. (प्रतिनिधी)तालुक्याचा अष्टपैलू खेळाडूरेल्वेत नोकरीला असणारे विजय अष्टपैलू खेळाडू होते. षट्कारांचा बादशहा म्हणून ते सर्वत्र परिचित होते. नोकरी सांभाळून ते क्रिकेट खेळायचे. बऱ्याचदा चौकार, षट्कारांची बरसात करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून द्यायचे. त्यामुळे क्रिकेटरसिक त्यांच्या खेळावर फिदा होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे वैभववाडी तालुका अष्टपैलू खेळाडूला मुकला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.