शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या जंगल संवर्धनासाठी दौड

By admin | Updated: December 26, 2015 00:03 IST

‘मेरा तेरह रन’ उपक्रम : गतवर्षी १३ दिवसात १३ शहरात १३ मैल धावून निधी जमा

चिपळूण : कोयना घाटमाथा ते चिपळूण हे २२ कि. मी. अंतर सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘मेरा तेरह रन’, सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरु यांच्यातर्फे जगदीश दमानिया यांच्या नेतृत्वाखाली ९ सदस्यांनी पूर्ण केले. या दौडमधून सदस्यांनी जंगल संवर्धनाचा संदेश दिला. यामध्ये मोहीत रायसोनी, अविनेश सैनी, ब्रिजेश गजारिया, भरत रामनाथ, अजय चौधरी, भरत श्रीनिवासमूर्ती, कर्नल श्रीकृष्ण, अरुंधती राव, जगदीश दमानिया हे सदस्य होते. नेहल जोशी व त्यांच्या १२ व ९ वर्षाच्या लय व ओवी या मुलानी ११ कि. मी. अंतर धावून आपली जंगलाप्रती आस्था व्यक्त केली. सह्याद्रीचे नितीन तांबे, उदय पंडित, सुहास पंडित, विश्वास जोशी यांनी ११ कि. मी. दौड पूर्ण करत जंगल संवर्धनाचा नारा दिला. बहादूरशेख ते चिपळूण या जनजागृती दौड रॅली रुद्र अ‍ॅकॅडमीच्या ५० मुले व मुली यांनी संचालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी कोले सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे डॉ. विक्रम घाणेकर यांनी रॅलीला भेट दिली. त्यांच्याहस्ते ‘मेरा तेरह दौड’चे जगदीश दमानिया यांना तर परिक्षेत्र वन अधिकारी कोले यांच्याहस्ते कर्नल श्रीकृष्ण यांचा सत्कार करण्यात आला. संजीव अणेराव, भाऊ पवार, कमलाकर बेंडके यांच्याहस्ते मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सह्याद्री निसर्ग मित्रचे सर्व सभासद या जनजागृती दौडमध्ये सहभागी झाले होते. कैलास देवळेकर व योगीराज राठोड यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. ‘मेरा तेरह रन’ या उपक्रमाअंतर्गत गेल्यावर्षी १३ दिवसात १३ शहरांमध्ये दररोज १३ मैल धावून सामाजिक संस्थांसाठी निधी उभा केला. या उपक्रमातून जमा होणारा निधी सह्याद्रीच्या माझं जंगल या लोकसहभागातून ‘जंगल संवर्धन’ या उपक्रमासाठी खर्च करण्यात येणार आहे. जंगलाचे महत्त्व माणसाला पटू लागले आहे. दरवर्षी येणारे दुष्काळ, महापूर, ढगफुटी हे जंगलाच्या नाशामुळे झाले आहे. जंगलाचे संवर्धन केले तरच यातून माणूस बाहेर पडू शकेल. हे सारे या दौडदरम्यान नागरिकांना सांगण्यात येत आहे. जंगल संवर्धनाचे महत्व सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात १२५ लोक सहभागी झाले होते. रामाशीष जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोयना घाटमाथा ते चिपळूण अंतर पार.सह्याद्री निसर्ग मित्र व इम्पॅक्ट गुरू संस्थेचा सहभाग.दुष्काळ, महापूर, ढगफुटी जंगल नाशामुळे.रूद्र अ‍ॅकॅडमीच्या ५० मुले आणि मुलींचा सहभाग.दौडदरम्याने जंगल संवर्धनाचे महत्व.