शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोसबाग पुलाचा प्रश्न निकाली

By admin | Updated: June 17, 2016 23:24 IST

शीतल राऊळ, मंदार कल्याणकर यांची माहिती : १६ कोटीचा निधी मंजूर, वर्षाअखेरीस कामास सुरूवात

बांदा : भाजपाच्या माध्यमातून बांदा शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आरोसबाग येथील पूलाचा आराखडा तयार करण्यात आला असून या पूलासाठी १६ कोटि रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पूलाची भूगर्भ चाचणी पूर्ण झाली असून या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूलाच्या कामाची पायाभरणी होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शितल राऊळ व बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.बांदा शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आरोसबाग पुलासाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. पुलासाठी १३ कोटी रुपये तर दोन्ही जोडरस्त्यांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.शहरातील मिठगुडी, लकरकोट परिसरात तेरेखोल नदिपात्रालगतचा बराचसा भाग कोसळल्याने याठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारा बांधावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. येथे ३00 मीटर संरक्षक भिंत बांधण्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधी मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मंजूूर करण्यात आला आहे. बांदा-वाफोली मार्गावरील निमजगा येथील पाटो पुलासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ९0 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निमजगा-गवळीटेंब वाडीसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५0 लाख निधी मिळाला असूून या नळयोजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील पाणीटंचाई दुर होणार असून भविष्यात बांदा शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे. तुळसाण पुल येथे पक्का बंधारा बांधण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. याचा फायदा या नदिपात्रातील १२ गावांच्या नळपाणीयोजनेला होणार आहे. बांदा शहरात १00 एलईडी पथदिप बसविण्यात येणार आहेत.शहरातील निजमगा येथे तालुुका क्रिडा संकुलाला मंजुरी मिळाली असून क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी यासाठी ५ कोटि रुपयांचा निधी मंजुर केला आहे. वाढिव तिन कोटि रुपये निधी विशेष बाब म्हणून देण्यात आले आहेत. या संकुलाचे आॅक्टोबर महिन्यात भुमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच १४ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदांना थेट जमा करण्याचा निर्णय घेतल्याने याअंतर्गत बांदा ग्रामपंचायतीला यावर्षी १६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण होणारराज्यात शिवसेना-भाजपाच्या युतीचे सरकार असताना १९९७-९८ साली तत्कालिन बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर आघाडी शासनाच्या कालावधीत पंधरा वर्षे या पुलाचे काम पूर्णत: रखडले होते.आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर पुन्हा या कामासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे काम झाल्यास आरोसबाग येथील १000 लोकवस्तीचा रहदारीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.