शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण नको

By admin | Updated: December 22, 2014 00:20 IST

नीतेश राणे : कणकवलीतील पाणीटंचाई आढावा बैठकीत आवाहन

कणकवली : पाणी हे जीवन आहे. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक घरात २४ तास पाणी असावे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक असून त्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करा, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी कणकवली तालुका संभाव्य पाणीटंचाई आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती भिवा वर्देकर, जिल्हा परिषद सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, विभावरी खोत, पंचायत समिती सदस्य संतोष कानडे, महेश गुरव, संजय देसाई, दादा कर्ले, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. एम. शिंदे, नायब तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासह अन्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नीतेश राणे म्हणाले, प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी आजपासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीटंचाईच्या संदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील तसेच संबंधित प्रश्नांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. गावपातळीवर काम करणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. असा सुसंवाद असेल तरच विकासही निश्चितच होईल. त्यासाठी सर्वांनीच सकारात्मकपणे विचार करणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रश्न सोडविताना कोणत्याही प्रकारचे राजकारण अथवा पक्षभेद करण्यात येणार नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहणार असून प्रशासनाचे तसेच आपलेही त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर यांनी मानले. रमाकांत राऊत, हेमंत परुळेकर, विजय भोगटे, बबलू सावंत, संजय पाताडे, प्रकाश भालेकर आदींनी विविध समस्या तसेच प्रस्ताव यावेळी मांडले. (वार्ताहर)