शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

शाळांची गुणवत्ता वाढली

By admin | Updated: January 5, 2015 18:59 IST

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील २९३ प्राथमिक शाळा अ श्रेणीत

रहिम दलाल- रत्नागिरी -ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या २९३ प्राथमिक शाळांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांची तपासणी सुरू आहे. विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन याद्वारे करण्यात येत आहे. हे मूल्यांकन २०० गुणांचे ठेवण्यात आले आहे. यामध्ये शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता आदींचा समावेश करण्यात आला आहे. शाळा व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन वर्षातून एकदा करण्यात येते. या मुल्यांकनामध्ये शाळा व्यवस्थापन समितीसमोर विद्यार्थी व शिक्षकांचे कथाकथन, काव्य वाचन, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, शिक्षकांच्या सहाकार्याने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, फळे आदींची विक्री शाळेच्या क्रीडांगणावर प्रदर्शन भरवून ग्रामस्थांना निमंत्रित करणे, त्यातून खरेदी - विक्री, आर्थिक व्यवहार आदींच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक माहिती समजण्यामध्ये मोठा हातभार लावगण्यात येईल. शाळांना मुल्यांकनानुसार अ, ब, क, ड, ई अशी श्रेणी देण्यात येते. तालुका व जिल्हास्तरावर शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी अशा दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दर्जामध्ये वाढ झाली आहे. गत शैक्षणिक वर्षामध्ये अ श्रेणीमध्ये ४५ शाळा, ब श्रेणीमध्ये ८९८ शाळा, क श्रेणीमध्ये १७७७ आणि ड श्रेणीमध्ये २३ शाळांचा समावेश होता. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असली तरी शैक्षणिक दर्जा मात्र उंचावत आहे. त्यामुळे प्रत्येक श्रेणीतील शाळांची संख्याही आता वाढू लागली आहे. (शहर वार्ताहर)तालुकास्तरावर मूल्यांकन समित्या...तालुकाअबकडमंडणगड३७११२१९००दापोली३९१४३११०००खेड१३९३३०९चिपळूण२८१६६१७१२गुहागर१९१४७४००रत्नागिरी८२२१२४३१संगमेश्वर७१४९२४१२लांजा६३१४७१७०राजापूर१७२८५६१०एकूण२९३१४००१०३२१४ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळांच्या मुल्यांकनासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची तालुका व जिल्हास्तरावरची शाळांच्या गुणवत्तेची पाहणी केल्यानंतर शाळांची श्रेणी ठरविण्यात आली आहे.गुणांच्या आधारे शाळांचे वर्गीकरणअ९० ते १०० टक्केब८० ते ८९ टक्केक६० ते ७९ टक्केड४० ते ५९ टक्केइ ० ते ३९ टक्के