शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावातील त्रुटी कार्यालयातच पूर्ण करणार

By admin | Updated: December 14, 2014 23:54 IST

निवृत्तिवेतन संदर्भ : विभागीय शिक्षण उपसंचालकांचे संबंधिताना आदेश

रत्नागिरी : शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे प्रस्ताव शाळांनी नियोजित वेळेत पाठविण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेकडून नियोजित सेवानिवृत्तांची यादी सहा महिने आधी शिक्षणाधिकारी कार्यालयात मागवून घेण्यात येणार आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीचे परिपूर्ण प्रस्ताव न आल्यास किंवा प्रस्तावात त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व लिपिकांना शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक एम. के.गोंधळी यांनी दिले. माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय पदाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांची सहविचार सभा उपसंचालक गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विविध विषयांवर झालेल्या चर्चेअंती रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिला. यावेळी अनेक शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांतील विविध प्रस्ताव मान्यतेअभावी प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदावरील बढतीच्या नियुत्या, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, पदवीधर प्रशिक्षित पदावरील समावेशन, शिक्षणसेवकांना सहाय्यक शिक्षकांची मंजुरी याबाबतच्या प्रस्तावांचा समावेश आहे. त्यांना नियोजित वेळेत मान्यता न देण्यामागील कारणांची चौकशी करण्यात येईल, असेही गोंधळी यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागाच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता चार वर्षांपूर्वी करून नियुक्त केलेल्या रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मान्यतेची विभागीय स्तरावरून चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मे २०१२पूर्वी नियुक्तीची कार्यवाही सुरू झालेल्या जिल्ह्यातील १३ शिक्षकांना मंत्रालयीन स्तरावरून तत्वत: मान्यता मिळालेली असताना संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडून रखडलेल्या मान्यतेचा अहवाल मागवून घेऊन त्यावर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.दि. ६ आॅगस्ट २0१४च्या परिपत्रकानुसार ज्या शाळांना मान्यता मिळाल्या होत्या, तेथील शिक्षकांना मान्यता तसेच शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केलेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना नवी वेतनश्रेणी मंजुरी देण्यासाठी डिेसेंबरअखेर स्वतंत्र कॅम्प लावून मंजूरी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जुन्याप्रमाणे पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, असा न्यायालयाचा आदेश असणाऱ्या काही शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची खाती अद्याप उघडलेली नाहीत, याबाबतची कार्यवाही करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. शिक्षणाधिकारी स्तरावर न सुटलेल्या शिक्षकांच्या काही वैयक्तिक प्रश्नांवरही यावेळी चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले. शिक्षकांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. चर्चेला घेण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सात प्रकरणांचा समावेश होता. निर्णय प्रक्रियेमुळे आता अनेक प्रश्न मार्गी लागतील. तब्बल तीन तास चाललेल्या या सहविचार सभेत जिल्ह्यातील विविध प्रश्नांची संख्या सर्वाधिक होती. या सभेला सहाय्यक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, रत्नागिरी उपशिक्षणाधिकारी डी. एस. पवार, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भारत घुले, कार्यवाह अशोक आलमान, आत्माराम मेस्त्री, मजालुद्दीन बंदरकर, राम पाटील, बी. डी. पाटील, राजेश वरक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)