शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

कारागृहाच्या संरक्षक भिंतींची उंची वाढवणार

By admin | Updated: December 30, 2015 00:44 IST

प्रस्ताव तयार : सुरक्षेच्या दृष्टीने उपाय

सावंतवाडी : सावंतवाडीतील कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने कारागृहाची संरक्षक भिंत पाच फुटाने वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याने आता या भिंतीची उंची १७ फूट होणार आहे. उंची वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, या प्रस्तावाला जिल्हाधिकारी स्तरावर मान्यता घेण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही तातडीने निधी देण्याचे कबूल केले आहे.सावंतवाडीतील कारागृह हे अडीच एकर जागेत बांधण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती असल्याने आजूबाजूला घरे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच सावंतवाडी कारागृह चर्चेत राहिले आहे. अट्टल चोरटा ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे हा या कारागृहातून पळून गेल्यानंतर या कारागृहाची सुरक्षा आणखी धोक्यात आली होती. लोकरेसारखा प्रकार पुन्हा या कारागृहात घडू नये, यासाठी कारागृह प्रशासन विशेष गंभीर झाले आहे.कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले व जेलर हेमंत पाटील यांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी बंदिवान नेहमी कामात असले पाहिजे. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. हे करीत असतानाच कारागृहाच्या बाबतही त्यांनी विशेष काळजी घेतली असून, सावंतवाडी कारागृहाची भिंत १२ फूट आहे. ती ५ फुटाने वाढवून १७ फूट करण्यात यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव जेल प्रशासनाने तयार केला आहे. जेलच्या संरक्षक भिंतीवरूनच अट्टल चोरटा ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे हा पळून गेला होता. त्यामुळेच हा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव कारागृह प्रशासन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार असून, संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यास नियोजनमधून पैसे देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. ही उंची वाढल्यास सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला फायदा होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहाच्या संरक्षक भिंतीची उंची फारच कमी असल्याचेही यावेळी सदाफुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)