शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

आचऱ्यातील घटनेचा ग्रामस्थांकडून निषेध

By admin | Updated: November 2, 2015 00:23 IST

व्यापारी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करणार

आचरा : आचरा पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात वादाचा उद्रेक होऊन शनिवारी त्याचे राड्यात रुपांतर झाले. या घटनेप्रकरणी आचरा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. तसेच पत्रकारांवरील हल्ला प्रकरणाचा आचरा येथील व्यापारी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करणार आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या राड्याचा आचरा सर्वपक्षीय ग्रामस्थांनी निषेध करत आचरा पोलीस व आचरा पत्रकार यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध केला व आचरा पोलिसांना पाठिंबा दर्शविला. अशा प्रकारची घटना आचऱ्यात घडली नव्हती. यापुढे घडता कामा नये जर तसा प्रयत्न झाल्यास आचरावासीय जशास तसे उत्तर देतील असा इशारा आचरावासीयांनी दिला. यावेळी सरपंच मंगेश टेमकर, राजन गावकर, अशोक गावकर, श्रीकांत सांबारी, जेरोन फर्नांडिस, जगदीश पांगे, विजय कदम, छोटू पांगे, चंदन पांगे, अभिजीत सावंत, विद्यानंद परब, श्याम घाडी, धोंडी चिंदरकर, संतोष कोदे आदी उपस्थित होते. शनिवारी बाहेरच्या मच्छिमारांनी आचऱ्यात घुसून केलेला राडा व त्यात पोलीस, पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या निषेध म्हणून सोमवारी पूर्ण दिवस आचरा बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी संघटना निषेध नोंदविणार आहेत. मनसे मच्छिमारांच्या पाठिशी राडा प्रकरणानंतर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आचरा पिरावाडी येथे भेट देत घडलेला राडा तसेच पोलीस आणि पत्रकार यांना झालेली मारहाण निंदनीय असली तरी याचे कर्ताकरविता हे शासन आहे. तत्कालीन पालकमंत्री व आताचे पालकमंत्री यांनी मच्छिमारांच्या भावनेशी खेळ केला. स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन जणू काय मच्छिमारांचा प्रश्न सोडविला असा आव आणत त्यांची दिशाभूल केली. पारंपरिक मच्छिमार हे गुन्हेगार नसून त्यांचा रोजीरोटीसाठी असलेला लढा आहे. महाराष्ट्र शासनाने चांगला वकील दिला असता तर पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करणारा निर्णय झाला नसता. यापुढे आंदोलन व न्यायालयीन लढ्यात मनसे ही पारंपरिक मच्छिमारांच्या पाठिशी राहणार असल्याचे यावेळी उपरकर म्हणाले. (वार्ताहर) वादास शिवसेना जबाबदार : काँग्रेस राडा प्रकरणानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, अशोक सावंत, मंदार केणी यांनी आचऱ्यात भेट दिली. यावेळी सतीश सावंत यांनी या पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांचा वाद चिघळल्यास पालकमंत्री जबाबदार आहेत. हा मच्छिमारांचा प्रश्न चिघळवून त्याला खतपाणी घालण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोप केला. भविष्यात मच्छिमार एकत्र येवून एकोप्याने व्यवसाय करतील यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सावंत म्हणाले.