शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेतील प्रकारचा भाजपातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 00:35 IST

मसुरेत भ्रष्टाचार : भाजपा घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

मालवण : मसुरे-डांगमोडे येथील मंजूर शेतविहिरीवर तत्कालीन सरपंच व काही पुढाऱ्यांनी संगनमताने अनधिकृतपणे नळयोजना सुरु केली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असे असताना गावच्या ग्रामसभेत हा पाणी प्रश्न आला असता भाजप सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा काहींनी प्रयत्न केला. या सर्व प्रकारचा तालुका भाजपच्यावतीने निषेध नोंदवण्यात येत आहे. मागील कालखंडात मसुरेत झालेल्या सर्व विकासकामांची भाजपच्यावतीने चौकशी करण्याचे काम सुरु आहे. लाखो रुपये खर्च करून एका वाडीत खारभूमी क्षेत्रात बांधलेल्या विहिरीवरही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत लवकरच भाजपचे शिष्टमंडळ सबळ पुरावे घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आगामी काळात मसुरे -डांगमोडे गावातील भाजपच्या सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कोण त्रास देत असेल तर भाजपा सहन करणार नाही. तसेच मसुरे ग्रामपंचायतीमध्ये गोपी पालव व अ‍ॅड. पूर्वा ठाकूर या दोन सदस्य भाजपाच्या माध्यमातून निवडून आले आहेत. येणाऱ्या काळात निश्चितच येथील जनतेला अपेक्षित विकास भाजपाच्यावतीने करण्यात येईल असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापुढे ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा. ग्रामपंचायतीकडे आलेल्या निधीचे वाटप सर्व सदस्यांत समान व्हावे, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर यांनी नव्या विहिरीसाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल असे सांगितले आहे. ही विहीर झाल्यास भविष्यात डांगमोडेतील पाण्याचा प्रश्न तिढा नक्की सुटू शकतो, असेही मोंडकर यांनी सांगितले. याबाबत भाजप तालुका कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी गोपी पालव, दिनेश सुर्वे, गजानन ठाकूर, महेश मांजरेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)