शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस युनिटचा अहवाल देण्याची कार्यवाही सुरू

By admin | Updated: November 1, 2015 00:08 IST

शासनाचा आदेश : युनिटची सद्य:स्थिती कळवा

ओरोस : बायोगॅस युनिटची कालमर्यादा निश्चित करण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून त्यासाठी जीर्ण झालेल्या बायोगॅस युनिटची सद्य:स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने कृषी विभागाला दिले आहेत. त्यानुसार सर्व्हे करून अहवाल तयार केला जात आहे. तो लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाकडून देण्यात आली. सध्या होत असलेल्या प्रचंड वृक्ष तोडीवर मात करून प्रदूषण रोखण्यासाठी तसेच इंधनांची बचत व्हावी यासाठी शासनाने बायागॅस युनिट बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. बायोगॅस युनिट बांधणे ही योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असून या योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या युनिटसाठी शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला ८ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीतजास्त बायोगॅस युनिट बांधण्यात आले आहेत. मात्र, बायोगॅस युनिट बांधून कित्येक वर्ष झाल्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी युनिटे बंद अवस्थेत आहेत, तर काही नादुरुस्त अवस्थेत आहेत. या युनिटच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने दुसरे युनिट मंजूर व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित शेतकऱ्याला एकदा बायोगॅस युनिटचा लाभ दिला असल्याने त्याला लाभ देता येत नसल्याची अडचण कृषी विभागासमोर उभी आहे. बायोगॅस युनिटची कालमर्यादा निश्चित करून शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह कृषी समिती सभेत शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीसह विचारविनिमय करून शेतकऱ्यांना या युनिटचा पुन्हा लाभ देण्यात यावा असा ठरावही जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तो शासनाला सादर करण्यात आला. जिल्हा परिषद सर्वसाधारण ठरावाची शासनाने दखल घेत जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या बायोगॅस युनिटची सद्य:स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. त्यानुसार सर्व्हेे सुरु करण्यात आला आहे. (वार्ताहर)