शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक मच्छिमारांचे शुक्रवारी जेलभरो

By admin | Updated: November 4, 2015 00:10 IST

एकतर्फी कारवाईचा निषेध : तहसील कार्यालयात आत्मसमर्पण करणार

मालवण : आचरा बंदर येथे घडलेल्या पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छिमार यांच्यातील संघर्षानंतर पारंपरिक मच्छिमारांवर गुन्हे दाखल करून अटकसत्राची एकतर्फी कारवाई पोलिसांनी हाती घेतली आहे. आचरा येथील हल्ल्यास पर्ससीनधारक तसेच पोलीस प्रशासन व मत्स्य व्यवसाय खाते जबाबदार आहे. पारंपरिक मच्छिमारांवर प्राणघातक हल्ले करणारे अनधिकृत पर्ससीनधारकांवर कारवाई न होता निरपराध पारंपारिक मच्छिमारांच्या होत असलेल्या अटकेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील शेकडो पारंपरिक मच्छिमार शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण तहसील कार्यालय येथे आत्मसमर्पण करत जिल्हाव्यापी जेलभरो आंदोलन करणार आहेत. मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मच्छिमारांची भूमिका स्पष्ट केली आहे. अनधिकृत पर्ससीन होड्यांवर कारवाई करत असताना स्थानिक मच्छिमार नारायण कुबल यांनी पोलीस प्रशासनास माहिती दिली. मात्र पुरेसे पोलीस बळ घटनास्थळी नव्हते. त्या दरम्यान, मत्स्य विभागास सहकार्य करणाऱ्या पारंपरिक मच्छिमार पेडणेकर यांना मारहाण झाली. तर मत्स्य व्यवसाय अधिकारी सुगंधा चव्हाण यांना शिवीगाळ करून सरकारी कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, पेडणेकर यांच्या मारहाणीचे वृत्त त्यांचे नातेवाईक विजय ढोके यांना समजताच ते घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अनधिकृत पर्ससीन धारकाकडून प्राणघातक हल्ला झाला. ढोके जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांविरोधात कोणतेही गुन्हे दाखल न करता मच्छिमारांवर गुन्हे दाखल केले. यात १९ मच्छीमारांसह आठ महिलांवर अटकेची कारवाई झाली आहे. याविरोधात जेलभरो आंदोलन निश्चित झाल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)