शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

प्रशांत म्हापसेकरचे चित्रप्रदर्शन मुंबईत

By admin | Updated: December 2, 2015 00:43 IST

शरद पवार, मधु मंगेश कर्णिकांची उपस्थिती

कणकवली : येथील प्रतिथयश चित्रकार प्रशांत म्हापसेकर याच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई-वरळी येथील नेहरू सेंटर गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. ५ डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची उपस्थिती लाभणार आहे. वय वाढत जाते तसा आठवणींचा संग्रह वाढत जातो. बऱ्यावाईट, आठवणी साठत जातात. एका कलाकाराला नेहमीच व्यक्त व्हायचे असते. गायक आपल्या गायनातून, शिल्पकार आपल्या शिल्पातून आणि चित्रकार आपल्या चित्रांतून व्यक्त होतो. चित्रकार हा पेशा म्हणूनही चित्र काढतो जेव्हा तो व्यक्त होतो. तेव्हा त्याच्या मनातील भावभावना, कल्पना कॅनव्हासवर उतरतात. कधी त्या आजूबाजूच्या दुनियेसंबंधी असतील, तर कधी स्वत:बद्दल. प्रत्येकाच्या आयुष्यासंबंधी आठवणींचे एक पुस्तक व्हावे. या आठवणींना एका शैलीत, एका मालिकेत ब्रशच्या फटकाऱ्याने बांधण्याचा हा प्रयत्न प्रशांतने केला आहे. हे सोलो चित्रप्रदर्शन म्हणजे त्यांच्या स्वत:संबंधी आठवणींचे गाठोडे आहे. गेल्या सात-आठ वर्षांत व्यावसायिक स्तरावर उत्तम तऱ्हेने काम करताना स्वत:च्या अनुभव विश्वाचे गाठोडे सर्वांसमोर रिते करावेसे वाटल्याने ‘आठवणी-रिमेम्ब्रन्स’ हे प्रदर्शन प्रशांत याने आयोजित केले आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी मोफत असून, जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत याने केले आहे. ओरोस येथील शरद कृषी भवन प्रशांत याची चित्रे आणि म्यूरल्सनी सजवण्यात आले आहे. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार शाहरूख खान, आमिर खान यांच्यासाठी प्रशांत याने काम केले असून, त्यांच्याकडून प्रशांतच्या कामाचा गौरव झाला आहे.