शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील वीजवाहिन्या होणार अंडरग्राऊंड : प्रज्ञा खोत

By admin | Updated: February 3, 2015 23:55 IST

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कणकवली : नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरातील वीजवाहिन्या अंडरग्राऊंड करण्यात येणार असून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. नगरसेवकांच्या उपस्थितीत वीज महामंडळ तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्यावतीने या बाबत शहरात लवकरच सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अ‍ॅड. खोत म्हणाल्या, वीजवाहिन्या अचानक खाली तुटून पडल्याने अनेक दुर्घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत असतो. जनावरे दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून नगरपंचायतीच्यावतीने वीज महामंडळाला तसेच तत्कालिन पालकमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. याला प्रतिसाद मिळाला असून शहरात वीजवाहिन्या अंडरग्राऊंड करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या योजनेबाबत शहरात सर्व्हे करण्यात येणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरपंचायतीने पावले उचलली आहेत. वागदे येथील गोपुरी आश्रम प्रशासनाबरोबर पाच वर्षाचा करार करण्यात आला आहे. तेथील कोंडवाड्यात मोकाट गुरांना ठेवण्यात येणार आहे. तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांना दंड आकारण्यात येणार आहे. त्यांनी वेळेत आपली गुरे न नेल्यास त्यांचा लिलाव करण्याचा निर्णयही नगरपंचायतीने घेतला आहे. शहरातील अद्ययावत मच्छिमार्केटचे काम ७० टक्के झाले असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. या ठिकाणी कोल्ड स्टोअरेजसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी नगरपंचायत कटीबद्ध असून विविध विकासकामे करताना नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी यावेळी केले. (वार्ताहर)शहरातील नळ योजनेचे पाणी नागरिकांना २४ तास मिळावे यासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्याबाबत वीज मंडळाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच वीज मंडळाकडे सन २०११ मध्ये २० लाख रूपये भरण्यात आले आहेत. मात्र अद्यापही वीज मंडळाकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. नगरपंचायतीने निधी वर्ग करूनही वीज मंडळाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी नगरपंचायतीच्यावतीने लेखी पत्राद्वारे वीज मंडळाकडे करण्यात आली आहे.- अ‍ॅड. प्रज्ञा खोत, नगराध्यक्षा, कणकवली नगरपंचायत