शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 30, 2015 00:35 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस : महावितरण कंपनीचे पाच विभागात विभाजन करण्याच्या निर्णयाविरोधात व आपल्या आठ प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या न्याय मागण्यांसाठी विविध घोषणा देत संघटनेने येथील परिसर दणाणून सोडला.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कोकण परिमंडलचे अध्यक्ष नीलेश आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव प्रशांत आस्वेकर, कृष्णा साटेलकर, विजय शिरोडकर, सुभाष डिगसकर, अमित मेस्त्री यांच्यासह विद्युत सहाय्यक अभियंता, तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीतर्फे महावितरण कंपनीचे क्षेत्रीय पातळीवर पाच कंपन्यांमध्ये विभाजन करण्याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अशांतता निर्माण झाली आहे. विभागीकरण ही कंपनीकरणाचीच पायरी असल्यामुळे त्यास संघटनेने जोरदार विरोध सुरु केला आहे. विभागीकरण करण्याऐवजी राज्यातील सर्व १६ झोन अधिक मजबूत करून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात यावे व त्यावर विभागीय कार्यकारी संचालक यांचे नियंत्रण ठेवावे. तसेच आपल्या अन्य मागण्यांसाठी शासनाचे व कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी मुंबई येथील कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. परंतु आपल्या मागण्यांबाबत कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने या संघटनेने राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. (वार्ताहर)प्रमुख मागण्या : ...अन्यथा २0 पासून बेमुदत संपमहावितरणचे कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय पातळीवर पाच विभागात विभाजन करण्यात येवू नये.कोणतीही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता रिक्त जागा मागासवर्गीय यांचा अनुशेष लक्षात घेऊन भरण्यात यावीत.५ नोव्हेंबरचे परिपत्रक त्वरीत मागे घ्यावे.सुधारीत परिपत्रक काढून निवडपदांमध्ये गुणांची सवलत यादी द्यावी.सेवानिवृत्तीच्या दोन वर्षे आधी एक तृतीयांश उत्पादनाची रक्कम पूर्वीप्रमाणेच देण्यात यावी.वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी.मृत कर्मचारी वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सेवेत सामावून घ्यावे.बदली प्रकरणे त्वरित निकालात काढावीत व संघटनेने सुचविल्यानुसार बदली धोरणात बदल करण्यात यावा.बंदचा इशाराकंपनीने व शासनाने आपल्या ाागण्या मान्य न केल्यास २० जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.