शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रदूषणकारी प्रकल्पाची चौकशी करणार

By admin | Updated: December 22, 2014 00:21 IST

दीपक केसरकर : पर्यटन हॉटस्पॉटवर प्रकल्प कसा?

सावंतवाडी : टाटा कन्सल्टन्सीच्या अहवालाप्रमाणे आरोंदा पर्यटनाचा हॉटस्पॉट म्हणून विकसित करायचा आहे. असे असताना प्रदूषणकारी प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी कशी काय देण्यात आली याची चौकशी केली जाईल. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊ, असे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.सावंतवाडी येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपवनसंरक्षक रमेशकुमार, अभियंता प्रकाश शिंदे, तहसीलदार सतीश कदम, आदी यावेळी उपस्थित होते.राज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी गावातील लोकांच्या भावनेचा आदर करतो. तेथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. टाटा कन्सल्टन्सीच्या अहवालाप्रमाणे सिंधुदुर्गचे अनेक भाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे आरोंद्यामधील तेरेखोल खाडी ही पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.एखादा प्रदूषणकारी प्रकल्प जर पर्यटनाच्या ठिकाणी आणायचा असेल तर शासनाची उच्चस्तरीय समिती नेमली गेली आहे. त्या समितीने त्या प्रकल्पाला परवानगी द्यावी लागते, अशी परवानगी संबंधित कंपनीने घेतली आहे का, हे तपासावे लागणार असून त्यानंतरच या ठिकाणी प्रकल्पाबाबत विचार करावा लागणार आहे.रस्ता अडवला अशी तक्रार तेथील ग्रामस्थांची असल्यास त्याची चौकशी होईल आणि सत्य काय ते बाहेर येईल. आम्ही आरोंदा जेटीबाबत सर्व बाबी पूर्वग्रहदोष न ठेवता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ आणि नंतर शासन काय तो निर्णय घेईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. आरोंदा खाडीत असलेली हाऊस बोट तारकर्लीला हलवल्याबाबत मंत्री केसरकर यांनी सांगितले की, बोट हलवली तरी टाटा कन्सल्टन्सीचा अहवाल जाग्यावरच आहे. त्यामुळे आरोंदा हा हॉटस्पॉट करण्यात आला आहे, असेही यावेळी सांगितले.प्रकल्पाला स्थगिती देण्याबाबत अहवाल मागवणारआरोंदा जेटी प्रकल्पाला स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, पण सर्व कागदपत्रे पाहिली जातील. त्यानंतर ग्रामस्थांवर होणारा अन्याय तसेच प्रकल्पाचा भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन स्थगितीबाबत विचार करू, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.आरोंदा जेटीची चौकशी करा : खासदार राऊतआरोंदा जेटीवर घालण्यात आलेली भिंत ग्रामस्थांवर अन्याय करणारी असून या जेटीचा अहवाल तातडीने मला द्या, असे आदेश बंदर विभागाचे अभियंता सदाशिव इंगळे यांना दिले. तुम्ही जर हा अहवाल दिला नाही तर तुमच्या चौकशीसाठी समिती नेमावी लागेल, असेही यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)