शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

सनराईज कंपनीला ‘प्रदूषण’ची नोटीस

By admin | Updated: January 28, 2016 00:16 IST

कारवाईचा इशारा : कन्व्हेअर बेल्टमुळे धुळीचे प्रमाण वाढले

दापोली : तालुक्यातील उंबरशेत येथे सनराईज मरीन एंटरप्रायझेस बार्जमध्ये बॉक्साईट भरण्यासाठी उभारलेल्या कन्व्हेअर बेल्टमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण विहीत पातळीपेक्षा जास्त आढळल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाने या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, सात दिवसात उत्तर न दिल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असही या नोटीशीत म्हटले आहे.उंबरशेत येथे आशापुरा माईनकेम बॉक्साईटची वाहतूक मंंडणगड तालुक्यातील साखरी येथील जेटीपर्यंत डंपरद्वारे केली जात असून, हे अंतर २६ किमी आहे. हे अंतर जास्त असल्याने सनराईज मरीन एंटरप्रायझेसने उंबरशेत येथे खाडीकिनारी कन्व्हेअर बेल्ट उभारला आहे. या बेल्टमधून बार्जमध्ये बॉक्साईट भरले जाते. हे अंतर केवळ ५ किमी असल्याने आशापुरा कंपनीचा लाखो रुपयांचा वाहतूक खर्च वाचला आहे. मात्र, कन्व्हेअर बेल्टच्या ठिकाणी डंपरमधून बॉक्साईट उतरवताना व कन्व्हेअर बेल्टमधून ते बार्जमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. येथील मशीद, शाळा व घरांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरते. याला कंटाळून परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर २ जानेवारी रोजी तहसीलदार कल्पना गोडे यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत त्यांना तथ्य आढळून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चिपळूण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उंबरशेत येथे येऊन कन्व्हेअर बेल्ट सुरु असताना उडणाऱ्या धुळीचे प्रमाण मोजले असता ते विहीत पातळीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. या कार्यालयाने आपल्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाला याबाबत आपला अहवाल ६ जानेवारी रोजी सादर केला. त्याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सनराईज मरीन एंटरप्रायझेस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयात सुनावणी होणारअसल्याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) केदार साठे : ‘आशापुरा’विरोधात उपोषणदापोली तालुक्यातील केळशी - उटंबर येथील नागरिकांचे जीवन असह्य करणाऱ्या आशापुरा कंपनीच्या विरोधातही येथील भाजपचे उपजिल्हाध्यक्ष केदार साठे व उटंबर ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून दापोली तहसील कार्यालयासमोर आपले उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरुच होते.आंदोलन मागेबुधवारी सायंकाळी उशिरा साठे यांनी आपले उपोषण मागे घेतले. आशापुरा कंपनीविरोधात कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.