शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये रंगली राजकीय फटकेबाजी

By admin | Updated: December 7, 2015 00:15 IST

सर्वपक्षीय नेते : ‘इनडोअर गेम’ क्रीडा संकुलाचे लोकार्पण

खेड : खेड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली जोरदार फटकेबाजी अनुभवायला मिळाली. या क्रीडा संकुलासाठी आमदार रामदास कदम यांनी प्रयत्न केल्याचे शिवसेनेच्या गटनेत्यांनी सांगितले. तर मनसेच्या नगराध्यक्षांनी यासाठी ठराव केल्याचे सांगितले. या सर्वांचा समाचार घेत आमदार संजय कदम यांनी नुसता ठराव करून चालत नाही असे सांगत दोघांचीही दांडी गुल केली.खेड शहर आणि तालुका हा तसा मागासलेला आहे़ मात्र, गेल्या काही वर्षात येथे चांगले खेळाडू तयार होत आहेत़ विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने परिपूर्ण खेळाडू तयार होत नाहीत. आता तालुक्यात नवीन क्रीडा संकुल उभे राहिले असून, ‘इनडोअर गेम’साठी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचे आज लोकार्पणही झाले आहे. ही बाब खेडवासियांसाठी भूषणावह असून, यातूनच नवे राष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतील, असा विश्वास आमदार संजय कदम यांनी यावेळी व्यक्त केला. शहरातील महाडनाका येथील गोळीबार मैदानानजीक हे क्रीडा संकुल उभे राहिले आहे़ आमदार संजय कदम यांचे हस्ते क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला़ यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये- पाटणे, सभापती चंद्रकांत कदम, सेनेचे गटनेते संजय मोदी, उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार अमोल कदम, गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, मुख्याधिकारी महादेव रोडगे आणि उपअभियंता धनंजय जाधव उपस्थित होते़ शिवसेनेचे गटनेते संजय मोदी यांनी हे क्रीडा संकुल उभे रहावे यासाठी आमदार रामदास कदम यांनी प्रयत्न केले होते़ त्यांच्या प्रयत्नांनीच ते मंजूर झाले आहे, असे सांगितले़ मनसेच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये - पाटणे यांनी नगर परिषदेने या संकुलाचा ठराव केल्याचे व तो आता प्रत्यक्षात उतरला असल्याचे सांगितले़ या दोन्ही वक्तव्यांचा समाचार घेत आमदार संजय कदम यांनी नुसता ठराव करून चालत नाही तर तो अंमलातही आणावा लागतो व प्रत्यक्ष कृतीही करावी लागते, असे सांगितले़ यावेळी विरोधक आणि आमदार कदम यांच्यातील शाब्दीक जुगलबंदीचा अनुभव रसिकांनी घेतला. (प्रतिनिधी)