शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या माणसांनीच कोकणचा उठविला लाभ

By admin | Updated: December 31, 2015 00:29 IST

महेंद्र नाटेकर : कणकवलीतील स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीच्या सभेत प्रतिपादन

कणकवली : धरणे, पाटबंधारे झाले, चौपदरी महामार्ग झाला, इंजिनिअरिंग, मेडिकल महाविद्यालये झाली, उद्योगधंदे आले व कोकणी माणसाला वंचित ठेवून बाहेरच्या माणसांनी लाभ उठवला. कोकण विकास झाला असे म्हणता येणार नाही. कोकण विकास म्हणजे कोकणी माणसांचा विकास आणि असा विकास स्वतंत्र कोकण राज्यातच होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. कणकवली येथील वृक्षमित्र हॉलमध्ये स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीची सभा आयोजित केली होती. यावेळी नाटेकर बोलत होते. वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, मोतीराम गोठीवडेकर, संजय हंडोरे, सुरेश हाटे उपस्थित होते.नाटेकर म्हणाले की, आज ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या लोकांची होते. स्वतंत्र राज्य असल्यास गोव्याप्रमाणे १०० टक्के नोकरभरती कोक णी तरुणांचीच होईल. ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या बेरोजगारांची होत असल्याने कोकणातील एस.टी., एन.टी., ओ.बी.सी. आदी मागासवर्गीयांना याचा लाभ होत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले तरी या आरक्षणापासून कोकणातील मराठे वंचित राहणार. कोकणात औष्णिक, आण्विक इत्यादी विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ घातले आहेत. त्याच्या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत. तरी विनाशकारी प्र्रकल्प सुरूच आहेत. सुरूच राहणार! परराज्यातील मच्छिमार कोकणात येऊन कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त करून माशांची लूट करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पाठींब्यानेच हे सारे घडत आहे. केंद्र सरकार राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विनाशकारी प्रकल्प आणूच शकत नाही. हे प्रकल्प रोेखायचे असतील तर स्वतंत्र कोकण राज्यच पाहिजे. यावेळी वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, संजय हंडोरे यांनी भाषणे केली. सुरेश हांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)