शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम उपरकर यांना जामीन मंजूर

By admin | Updated: May 28, 2014 01:35 IST

सरकारी कामात अडथळा प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : मालवणचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गजानन मातोंडकर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी आमदार व मनसेचे नेते परशुराम उपरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने रोख २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. उपरकर यांच्यावतीने अ‍ॅड. संग्राम देसाई व अ‍ॅड. राजन शिरोडकर यांनी काम पाहिले. ३ मार्च २००८ रोजी दुपारी २.३० वाजता शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या तहसील कार्यालयातील मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आलेल्या परशुराम उपरकर यांनी तहसील कार्यालयातील गेटवर कोणतीही आगाऊ सूचना न देता जमावासह आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस अधिकारी गजानन मातोंडकर यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपरकरांसह गोवेकर आणि लुडबे यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच सस्पेंड करण्याची आणि अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणू अशी धमकी दिली. या प्रकरणी मातोंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान वरील तीनही आरोपींना प्रत्येकी एक वर्षाची साधी कैद आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाच्या विरोधात वरील तिघांनीही येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानुसार न्यायालयाने गोवेकर व लुडबे यांना निर्दोष मुक्त केले तर उपरकर यांना दोषी ठरवत एक महिना साधी कैद आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, उपरकर यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी वकीलाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार उपरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने रोख २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन भरून घेण्याची पूर्तता मालवण न्यायालयात होणार आहे. (प्रतिनिधी)