शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

पक्षभेद विसरुन संघटीत व्हा

By admin | Updated: June 23, 2014 01:37 IST

श्रीधर नाईक यांना आदरांजली : कणकवलीतील स्मृतिदिन कार्यक्रमात उमटले सूर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा संस्कृतीयुक्त असून त्याला काही काळापूर्वी दहशतवादाची कीड लागली होती. ती नष्ट करण्यात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काही प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षभेद विसरून संघटीतपणे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यात यश मिळाल्यास तीच खरी श्रीधर नाईक यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात कै. श्रीधर नाईक यांना उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. श्रीधरप्रेमी मित्रमंडळाकडून मातोश्री मंगल कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा. विनायक राऊत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आ. प्रमोद जठार, आ. दीपक केसरकर, माजी आ. पुष्पसेन सावंत, गौरीशंकर खोत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, आबु पटेल, महिला आघाडीप्रमुख स्रेहा तेंडोलकर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, उद्योगपती विजय नाईक, कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते. श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहताना खासदार राऊत म्हणाले, नाईक यांची हत्या स्वार्थी राजकीय हेतूमुळे झाली होती. मात्र, स्वार्थी राजकारण्यांना शह देण्यासाठी आदर्शवत व संस्कृतीयुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्ता मागील लोकसभा निवडणुकीत पेटून उठला होता. त्यांच्यामध्ये श्रीधर नाईक यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता संचारला होता. त्यामुळेच अभूतपूर्व असे यश मिळू शकले. स्वत:चा स्वार्थ समोर ठेवून विकासकामे करायची नसतात तर लोकांच्या सहभागातून विकासकामे करायची असतात याचे भान नसलेल्या राज्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी येथील जनता सज्ज झाली आहे. यापुढे उपकारांची परतफेड परोपकारानेच केली जाईल, हीच इथली संस्कृती असून तिचे जतन करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. श्रीधर नाईक यांना अभिप्रेत असे समाजकार्य आपण सर्वांनी एकजुटीने केल्यासच तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले. विजय नाईक, आबु पटेल, अनिल हळदिवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी श्रीधर नाईक यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. (वार्ताहर)