शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा आदेश धाब्यावर

By admin | Updated: April 24, 2016 23:20 IST

दोडामार्ग तालुक्यातील ‘क्वॉरी’ व्यावसायिकांकडून प्रकार : दंड भरत नसल्याचीही तहसीलदारांची माहिती

कसई-दोडामार्ग : गौण खनिज उत्खननास न्यायालयाचे बंदीचे आदेश असतानाही दोडामार्ग तालुक्यात काळ्या दगडाच्या क्वॉरी सुरू आहेत. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत क्वारी मालक जुमानत नाहीत. ही बाब जिल्हाधिकारांच्या निदर्शनास आणून देत पोलीस बंदोबस्तात येत्या आठ दिवसात कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार पी. जी. केरकर यांनी देत ज्या क्वॉरीमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, ती दंडात्मक रक्कमही त्यांनी भरली नसल्याचे केरकर यांनी सांगितले. इकोसेन्सिटिव्ह झोनखाली तालुक्यातील बारा गावचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात गौण खनिज उत्खननास न्यायालयाने बंदीचे आदेश फर्मावले. मात्र दोडामार्ग तालुक्यात गौण खनिज उत्खननास परवानगी नसतानाही हे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरूच होते. तत्कालिन तहसीलदार संतोष जाधव हे कार्यरत असताना त्यांच्या कार्यकालात हे गौण खनिज उत्खनन सुरू होते. याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, जनतेने हे बेकायदा गौण खनिज उत्खनन ताबडतोब बंद करावे, अशी मागणी करून देखील तत्कालिन तहसीलदार संतोष जाधव यांनी कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई संबंधित व्यावसायिकांवर न करता हे गौण खनिज उत्खनन बंद करू शकले नाहीत. न्यायालयाचे आदेश असतानाही तहसीलदार जाधव यांच्या आशिर्वादाने हे गौण खनिज उत्खनन सुरूच राहीले. तत्कालीन तहसीलदार संतोष जाधव यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार पदाचा कारभार पी. जी. केरकर यांनी हाती घेताच तालुक्यात सुरू असलेले गौण खनिज उत्खनन म्हणजे काळ्या दगडाच्या क्वॉरी, जांभ्या दगडाच्या चिरेखाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश न्यायालयाच्या आदेशानुसार फर्मावले. त्यामुळे सर्व क्वॉरी व चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यात गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना व जमीन मालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशा नोटीसा तहसीलदार पी. जी. केरकर यांनी काढताच तालुक्यातील सर्व क्वॉरी व चिरेखाण मालक एकत्र आले आहेत.न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवून क्वॉरी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आपले व्यवसाय सुरूच ठेवले आहेत. तालुक्यातील शैलेश दळवी, अल्कॉन, नानो कंपनी या तिघांनाच परवानगी आहे. अन्य ठिकाणी वझरे, तळेखोल, मांगेली, तिलारी बुडीतक्षेत्रात सुरू असलेल्या या क्वॉरींना कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. गौण खनिज उत्खननास न्यायालयाचा बंदीचा आदेश असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात देणार आहे. कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करणार आहे. येत्या आठ दिवसात विनापरवाना सुरू असलेल्या क्वॉरीवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती तहसीलदार पी. जी. केरकर यांनी दिली. (वार्ताहर)तहसीलदार : कारवाईसाठी गेल्यास कामगार पळतातयाबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय अद्याप झाला नसतानाही दोडामार्ग तालुक्यात गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काळया दगडाचे उत्खनन करण्यासाठी सुरूंग स्फोट करण्यात येतात. याबाबत तहसीलदार पी. जी. केरकर यांना विचारणा केली असता क्वारी व चिरेखाण व्यावसायिक बंदीचे आदेश असतानाही हे व्यावसायिक जुमानत नाहीत. उत्खनन सुरू असलेल्या क्वारीवर कारवाईसाठी गेलो असता तेथे काम करणारे कामगार पळून गेले. बऱ्याच विनापरवाना सुरू असलेल्या क्वारी मालक व जमीन मालकांवर दंडात्मक कारवाई केली ती रक्कमही भरणा करण्यात आली नसल्याचे तहसीलदार पी. जी. केरकर यांनी सांगितले.