शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘भुयारी’च्या मुद्यावरून विरोधकांचा सभात्याग

By admin | Updated: June 20, 2014 00:14 IST

मुख्याधिकारी अनुपस्थित : कणकवली नगरपंचायतीच्या सभेत गदारोळ

कणकवली : भुयारी गटार योजनेसारख्या जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकल्पाबाबत तांत्रिक चर्चा करताना तसेच डीपीआरसंबंधी निर्णय घेताना मुख्याधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. या योजनेच्या डीपीआरसंबंधी निर्णय घेण्यापूर्वी जनतेलाही विश्वासात घेण्यात यावे, अन्यथा वेंगुर्ले तसेच मालवण येथे झालेल्या विरोधाप्रमाणे येथेही तो होईल, असे मत विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मांडले. मात्र डीपीआरसंबंधीचा निर्णय घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची आवश्यकता नाही. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी विनाकारण विलंब नको, असे सांगत सभा पुढे सुरू ठेवल्याने संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. दरम्यान, भुयारी गटार योजनेच्या मुद्यावरून गुरूवारी झालेली सर्वसाधारण सभा गाजली. काहीकाळ या मुद्यावरून सभागृहात गदारोळही झाला.येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी संतोष वारूळे, नगरसेवक बंडु हर्णे, नंदिता धुमाळे अनुपस्थित होते.या सभेत प्रामुख्याने भुयारी गटार योजनेच्या डीपीआरसंबंधीचा मुद्दा चर्चेत आला. याबाबत निर्णय घेण्यापूर्वी वेंगुर्ले, मालवण येथील जनतेचा विरोध लक्षात घेऊन सांगोपांग चर्चा करणे आवश्यक असल्याचे मत विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांनी मांडले. तर तांत्रिक चर्चा करताना प्रशासनाचे प्रमुख असलेले मुख्याधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यांच्या अनुपस्थितीत डीपीआरसंबंधीचा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नये, असे मत राजश्री धुमाळे यांनी मांडले. मात्र हा निर्णय मुख्याधिकाऱ्यांसाठी थांबविण्याची गरज नाही, असे नगरसेविका मेघा गांगण यांच्यासह अन्य नगरसेवकांनी मत मांडले. तर जनतेला विश्वासात घेऊनच भुयारी गटार योजनेबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच या योजनेसाठी शहरातील नागरिकांच्या जमिनी संपादीत कराव्या लागणार नाहीत, असे नगराध्यक्षांनी सांगितले. यानंतर भुयारी गटार योजनेच्या वाढीव डीपीआरसाठी मंजुरी देण्याचा निर्णय सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला. तसेच सभा पुढे सुरू ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारी मनमानी करून निर्णय घेत असतील तर आमचा त्याला विरोध राहणार असे सांगत सभात्याग केला.पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर शहरात करावयाची कामे, श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठीचे नियोजन, क्रीडा संकुलाबाबतचा निर्णय आदी विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकाजवळील ड्रेनेज पाईपलाईनसाठी रेल्वेने नाहरकत दाखला देण्याचे मान्य केले असून डिपॉझिट म्हणून ३३ लाख रूपये नगरपंचायतीला भरायला सांगितले आहेत. याबाबत त्या परिसरातील बिल्डर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र अनेक बिल्डर्स अनुपस्थित होते. नागरिकांच्या हितासाठी हा निधी भरून काम कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी सभागृहाला दिली. (वार्ताहर)